आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जास्त प्रदूषण पसरवणाऱ्या कारच्या किमती होणार वाढ;2018 च्या मानकानुसार एसयूव्ही पन्नास हजाराने महागणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- मोठ्या प्रमाणावर प्रदूषण पसरवणाऱ्या कार आता महाग होतील. कारवर लागणाऱ्या सेसचा दर कारची लांबी व कार्बन उत्सर्जनावर ठरणार आहे. सध्या कारच्या विक्रीवर २८ टक्के जीएसटीव्यतिरिक्त सेसही आकारण्यात येतो.  


नवे परिमाण लागू झाल्यानंतर एसयूव्ही कार ५० हजारांनी महागणार आहे. कारण या गाड्या २०१८ साठी ठरलेल्या परिमाणानुसार कार्बन उत्सर्जन जास्त प्रमाणावर करतात. नव्या नियमाचा मसुदा अवजड उद्योग मंत्रालयाने जारी केला आहे. अवजड उद्योग मंत्री अनंत गिते यांनी सांगितले, आमचा उद्देश कार्बन उत्सर्जनाच्या बाबतीत जागतिक परिमाण गाठण्याचा आहे. यासाठी छोट्या आणि कमी कार्बन उत्सर्जन करणाऱ्या कारला उत्तेजन देऊ. सरकारने वाहनांपासून होणाऱ्या कार्बन उत्सर्जनास २०२८ पर्यंत नवी परिमाणे ठरवली आहेत. मसुद्यावर सर्व घटकांशी विचारविनिमय केल्यानंतर यास अंतिम रूप दिले जाईल. मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही एसयूव्हीच्या किमती वाढू शकतात. कारण यापासून कार्बन उत्सर्जन होण्याचे प्रमाण १५५ ग्रॅम प्रतिकिमीपेक्षा थोडे जास्त आहे. प्रस्तावित नियम लागू झाल्यानंतर त्यांच्यावर २२ टक्क्यांऐवजी २७ टक्के सेस लावण्यात येईल. ज्या पेट्रोल व डिझेल कारचा कार्बन उत्सर्जन स्तर ठरलेल्या मानकापेक्षा कमी आहे, पण लांबी ४ मीटरपेक्षा जास्त आहे, तरीसुद्धा कर कमी होण्याची अपेक्षा आहे. 


सध्याचा जीएसटी व सेस  
सध्याच्या नियमानुसार कारवर २८ टक्के जीएसटी व कमाल २८ टक्के सेस लागतो.   सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्सचे उपमहासंचालक सुगातो सेन यांनी सांगितले, पेट्रोल कारच्या तुलनेत डिझेल कारद्वारे CO2 चे उत्सर्जन कमी होते. यामुळे काेणत्या कार स्वस्त होतील आणि कोणत्या महाग हे आज सांगणे अवघड आहे. 

 

कार्बन उत्सर्जनावर ठरेल सेसचा दर  
जर एखादी कार चार मीटरपेक्षा लहान असेल व १५५ ग्रॅम प्रतिकिलोमीटरपेक्षा कमी उत्सर्जन करत असेल तर फक्त १% सेस लागेल. परंतु कार ठरलेल्या मानकापेक्षा जास्त उत्सर्जन करत असेल तर १५ % सेस लागेल. ४ मीटरपेक्षा जास्त लांबीची कार जर ठरलेल्या मानकानुसार कार्बन उत्सर्जन करत असेल तर त्यावर १५ % सेस  व ठरलेल्या मानकापेक्षा जास्त उत्सर्जन होत असेल तर हा सेस २२ टक्के होईल.  

बातम्या आणखी आहेत...