आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुढील वर्षी भारत बनणार जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, इंग्लंड-फ्रान्सला पछाडणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'सेंटर फॉर इकॉनॉमिक्स अँड बिझनेस रिसर्च' म्हणजे CEBR ने 2018 साठी हा रिपोर्ट जारी केला आहे. - प्रतिकात्मक - Divya Marathi
'सेंटर फॉर इकॉनॉमिक्स अँड बिझनेस रिसर्च' म्हणजे CEBR ने 2018 साठी हा रिपोर्ट जारी केला आहे. - प्रतिकात्मक

लंडन/नवी दिल्ली - जागतिक अर्थकारणात भारत मोठी उडी घेण्याच्या तयारीत आहे. एका रिपोर्टमध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार भारत डॉलर टर्म्समध्ये ब्रिटन आणि फ्रान्सला मागे सोडून पुढच्या वर्षी जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्ता बनेल. भारताचे जगातील आघाडीच्या वाच सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थामध्ये सहभागी होणे हे जगातील आशियाच्या वाढत्या शक्तीचे प्रतिक आहे. या रिपोर्टनुसार आगामी 15 वर्षांत ग्लोबल इकॉनॉमीमद्ये आशियाई देशच अधिक असतील. 

 

ग्लोबल इकॉनॉमीवर दृष्टीक्षेप 
- 'सेंटर फॉर इकॉनॉमिक्स अँड बिझनेस रिसर्च' म्हणजे CEBR ने 2018 साठी हा रिपोर्ट जारी केला आहे. त्यात म्हटले आहे की, नव्या वर्षामध्ये ग्लोबल इकॉनॉमीचा वेग वाढणार आहे. त्यामागचे कारण स्वस्त वीज आणि तंत्रज्ञान हे असेल. 
- रिपोर्टमध्ये आशियाई देशांचा आवर्जुन उल्लेख करण्यात आला आहे. रिपोर्टनुसार आगामी 15 वर्षांदरम्यान जागतिक अर्थव्यवस्थेत आशियाई देशांचा दबदबा असेल. त्यात पहिल्या 5 अर्थव्यवस्थांमध्ये भारताच्या प्रवेशालाही याच दृष्टीकोनातून पाहायला हवे. 

 

भारताबाबत काय म्हटले 
- CEBR चे उपाध्यक्ष डगलस मॅक्विलियम्स म्हणाले, काही अडचणींमुळे भारत सध्या फ्रान्स आणि ब्रिटनबरोबर आहे. 2018 मध्ये डॉलरच्या तुलनेत भारत या दोन देशांना मागे सोडत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. 
- मॅक्विलियम्स म्हणाले, नोटबंदी आणि जीएसटीमुळे भारताचा आर्थिक विकास कमी झाला आहे. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, चीन 2032 पर्यंत अमेरिकेला मागे सोडून जगातील पहिल्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनू शकते. 
- अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा ट्रेड सेक्टरमध्ये प्रभाव दिसलेला नाही. तरीही अमेरिका ग्लोबल इकॉनॉमीमध्ये टॉपवरप राहील. 


ब्रेक्झिटचा फार परिणाम नाही 
- रिपोर्टमध्ये म्हटले गेले आहे की, ब्रिटनच्या युरोपीय युनियनमधून बाहेर पडल्याने (ब्रेक्झिट) त्यांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम दिसला आहे. पण ब्रेक्झिटबाबत ज्या शक्यता होत्या, त्या खऱ्या ठरल्या नाहीत. 
- रिपोर्टमध्ये म्हटले गेले आहे की, 2032 पर्यंत रशिया 11 व्या स्थानावरून घसरून 17 व्या स्थानावर येईल. 
- न्यूज एजन्सीने अर्थतज्ज्ञांकडून एक सर्वेक्षण केले. त्यात म्हटले आहे की, 2018 मध्ये ग्लोबल इकॉनॉमिक ग्रोथ 3.6 टक्के वेगाने पुढे जाईल. यावर्षी म्हणजे 2017 मध्ये ती 3.5 आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...