आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानशी चर्चेत तिसऱ्याचा हस्तक्षेप नामंजूर, भारताने फेटाळला चीनच्या राजदुतांचा प्रस्ताव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे राष्ट्रपती ममनून हुसैन काही दिवसांपूर्वी शांघाय येथील बैठकीत सहभागी झाले होते. (फाइल) - Divya Marathi
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे राष्ट्रपती ममनून हुसैन काही दिवसांपूर्वी शांघाय येथील बैठकीत सहभागी झाले होते. (फाइल)

- सुषमा स्वराज यांनी गेल्या महिन्यात म्हटले होते की, सीमेवर लोक मारले जात असताना चर्चेचा सूर योग्य वात नाही. 

- भारताने आधाही पाकिस्तानबरोबर त्रिपक्षीय चर्चेला नकार दिलेला आहे. 


नवी दिल्ली - भारताने चीनचे राजदूत लू झाओहुई यांचा प्रस्ताव फेटाळला आहे. पाकिस्तानशी चर्चेसाठी तिसऱ्या पक्षाचा समावेश करण्याचा सल्ला त्यांनी दिला होता. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सोमवारी रात्री उशीरा म्हटले होते की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध हे द्वीपक्षीय आहेत, त्यात तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप मंजूर नाही. लुओ ने म्हटले - शांघाय सहकारी संघटनेशिवाय भारत-पाकिस्तान आणि चीनने  त्रिपक्षीय चर्चा करायला हवी. 


- रवीश कुमार म्हणाले, आम्ही पाकिस्तानबरोबर चर्चेसाठी तिसऱ्या पक्षाचा समावेश करण्याचे राजदुतांचे वक्तव्य ऐकले आहे. पण चीनच्या सरकारकडून आम्हाला तसा काही सल्ला मिळालेला नाही. हे चीनच्या राजदुतांचे वैयक्तिक मत आहे. 


भारत-पाकिस्तान आणि चीनने चर्चा करावी 
चीनचे राजदूत लु झाओहुई यांनी दिल्लीमध्ये एका कार्यक्रमात हा सल्ला दिला. ते म्हणाले की, काही भारतीय मित्रांनी मला ही कल्पना सुचवली. चीन, रशिया आणि मंगोलियाच्या नेत्यांनीही असे केले आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानलाही त्यांच्यातील मुद्दा सोडवण्यासाठी असे करायला हवे. आता लगेच नाही तरी भविष्यासाठी हे पाऊल योग्य ठरू शकते. 


यावर्षी मोदी-जिनपिंग आणखी दोनदा भेटणार 
मोदी आणि जिनपिंग यांच्यात गेल्या दोन महिन्यात दोन वेळा भेट झाली. दोघे या वर्षाच्या अखेरीपर्यंत ब्रिक्स आणि जी-20 परिषदेतही भेटण्याची शक्यता आहे. मोदींनी 27-28 एप्रिलला वुहानमध्ये जिनपिंग यांच्याशी अनौपचारीक चर्चा केली होती. त्यानंतर ते 9 जूनला शांघाय सहकारी संघटनेच्या बैठकीत भेटले होते. 

 

बातम्या आणखी आहेत...