आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - भारतीय सैन्याने भारताच्या व्हॉट्सअॅप युजर्सना सतर्क केले आहे. सैन्याने आपल्या ऑफिशियल ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ जारी केला आहे, यात म्हटले गेले आहे की, भारतीय युजर्सचा व्हॉट्सअॅप चिनी हॅर्क्सच्या निशाण्यावर आहे. यापूर्वीही आर्मीने लाइन ऑफ अॅक्चुअल कंट्रोल (LAC) वर तैनात जवानांना सोशल मीडिया अॅप्लिकेशन्सच्या वापरावरून वॉर्निंग दिली होती, या अॅप्लिकेशन्समध्ये व्हॉट्सअॅपही सामील आहे.
आर्मीने व्हिडिओत काय म्हटले?
- आर्मीने हा व्हिडिओ 17 मार्च रोजी जारी केला होता.
- यात म्हटले होते की, "व्हॉट्सअॅप हे हॅकिंगचे नवे माध्यम बनत आहे. चायनीज तुमच्या डिजिटल जगात दाखल होण्यासाठी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मचा वापर करतात. तुमच्या सिस्टिममध्ये दाखल होण्यासाठी व्हॉट्सअॅप ग्रुप हे नवे माध्यम आहे."
एखाद्या खास क्रमांकाचा उल्लेख केला आहे?
- व्हिडिओत एखाद्या खास क्रमांकाचा उल्लेख केलेला नाही. मात्र, यात सांगितले आहे की, "+86 पासून सुरू होणारे चीनचे जे नंबर आहेत, ते तुमच्या ग्रुपमध्ये दाखल होऊन माहिती मिळवणे सुरू करतात."
यापासून वाचण्याची पद्धत सांगितली आर्मीने
- व्हिडिओद्वारे सांगण्यात आले आहे की, "आपल्या ग्रुपची पडताळणी करा आणि सातत्याने ग्रुपची निगराणीही करा. ग्रुपमध्ये सर्व काँटॅक्ट नाव सेव्ह असले पाहिजेत. अननोन नंबरचा त्वरित शोध घ्या. जर तुम्ही आपला मोबाइल नंबर बदलत असाल तर ग्रुप अॅडमिनला जरूर माहिती द्या. जर तुम्ही नंबर बदललाच तर सिम कार्ड नष्ट करा आणि त्या नंबरवरील व्हॉट्सअॅपही डिलीट करा. अलर्ट राहा आणि सुरक्षित राहा."
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.