आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माल्याची संपत्ती विकून बँकांनी वसूल केले 963 कोटी, उर्वरित रक्कम मिळण्याची आशा वाढली:SBI

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
- ब्रिटिश कोर्टाने लंडनमध्ये असलेल्या माल्याच्या मालमत्तांची चौकशी आणि जप्ती करण्यास मंजुरी दिली आहे.
- भारतीय बँकांच्या मते कोर्टाच्या आदेशानंतर वसुलीचा मार्ग आणखी सोपा होणार आहे. 
 
नवी दिल्ली - बँकांनी विजय माल्याच्या भारतातील सध्याच्या काही मालमत्ता विकून 963 कोटींची वसुली केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) चे एमडी अरिजित बसू यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. बसू यांनी सांगितले की, लंडनमध्येही रिकव्हरीसाठी कारवाईचा वेग वाढवला आहे. ब्रिटिश हायकोर्टाने ब्रिटनमधील एन्फोर्समेंट ऑफिसरला लंडनजवळ हर्टफोर्डशायरमधील माल्याच्या मालमत्तांची चौकशी करून त्याचा शोध घेण्याची आणि जप्तीची परवानगी दिली आहे. हा आदेश भारतीय बँकांसाठीही फायद्याचा आहे. भारतीय बँकांना आता विदेशातील माल्याच्या संपत्तीवर जप्ती आणणे सोपे होईल. 
 
एसबीआयचे एमडी म्हणाले की, माल्यावरील कर्जाची पूर्णपणे वसुली करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ब्रिटिश कोर्टाच्या निर्णयानंतर त्यापैकी मोठा बाग मिळणार असल्याची शक्यता आहे. एसबीआयच्या नेतृत्वातील 13 बँकांच्या कंजोर्शियमने माल्यांच्या किंगफिशर एअरलाइन्सला कर्ज दिले होते. 31 जानेवारी 2014 पर्यंत माल्यावर बँकांचे 6,963 कोटींचे कर्ज होते. 2016 पर्यंत ही रक्कम 9,000 कोटी झाली. कर्ज फेडण्याचा दबाव वाढल्यानंतर माल्या 2016 मध्ये विदेशात पळून गेला. 
 
भारतात माल्यावर मनी लाँडरिंगचा खटलाही सुरू आहे. त्याने नुकतेच त्याच्या राजकीय द्वेषातून आरोप झाल्याचे म्हटले होते. त्याने कर्ज फेडण्यासाठी त्याच्या मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाच्या ताब्यातून सोडण्याची मागणी केली होती. ईडीने मात्र त्यास नकार दिला होता. 
 
 
प्रॉपर्टीच्या जप्तीबाबत समन्वय नाही 
गुरुवारी दिल्लीच्या एका न्यायालयात ईडीच्या दिल्ली आणि मुंबई झोनमध्ये समन्वय नसल्याचे समोर आले. बेंगळुरू पोलिसांनी कोर्टात सांगितले की, त्यांनी 159 मालमत्तांची यादी केली आहे. पण त्यांची जप्ती होऊ शकली नाही. कारण त्यापैकी काहींची जप्ती आधीच झाली होती. तर इतर मालमत्तांवरही कारवाई सुरू होती. 

 

बातम्या आणखी आहेत...