आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - रेल्वेत खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना आता प्रवाशांना बिल देणे बंधनकारक करण्यात आले आहे. विक्रेत्यांनी बिल दिले नाही तर प्रवाशांनी खाद्यपदार्थांचे पैसे देऊ नयेत, असे आदेश रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी काढले होते. त्याची सुरुवात बंगळुरू-नवी दिल्ली दरम्यान धावणाऱ्या कर्नाटका एक्स्प्रेसमध्ये झाली आहे. या रेल्वेत विक्रेत्यांना पॉस मशीन देण्यात आले आहे. आता प्रवाशांनी चहा जरी घेतला तर त्याची अधिकृत पावती देणे विक्रेत्यांना बंधनकारक असेल.
केटरिंग कर्मचारी बिल देण्यास नकार देऊ शकत नाही
- रेल्वेने लागू केलेल्या नव्या योजनेनुसार, रेल्वेमध्ये खाद्य पदार्थांचे बिल देणे हे केटरिंग कर्मचाऱ्यांना बंधनकारक आहे. जर त्यांनी बिल दिले नाही तर प्रवाशांना मोफत खाद्य पदार्थ दिले जातील.
- प्रवाशांची तक्रार राहिली आहे की केटरिंग स्टाफ बिल देण्यासा स्पष्ट नकार देतात. बिलबुक सोबत नाही, नंतर आणून देतो अशी सबब ते सांगत असतात.
- रेल्वेचा नवा नियम 31 मार्च 2018 पासून पेंट्री कार असलेल्या सर्व ट्रेनला लागू असणार आहे. वेंडरने जर बिल देण्यास नकार दिला तर केटरिंग कंपनीचा परवाना रद्द केला जाणार आहे. त्यासोबतच सरकारने पेंट्री कारच्या चौकशीसाठी एक स्पेशल टीम तयार केली आहे.
- काही दिवसांपूर्वी रेल्वेच्या पेंट्री कारमध्ये उकडलेले बटाटे कर्मचारी पायाने कुसकरत होते.
रेल्वेमध्ये खाद्य पदार्थांचे पेमेंट पीओएस मशीनने
- ट्रेनमध्ये विक्री होणारे खाद्य पदार्थ आणि इतर वस्तू यासाठी विक्रेते अव्वाच्या सव्वा भाव वसूल करतात अशी प्रवाशांची तक्रार होती. त्यासाठी रेल्वेने वेंडरला कॅशलेस करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांना पाँइट ऑफ सेल (पीओएस) मशीन दिली जाणार आहे.
- रेल्वेने पीओएस ही सर्व्हिस बंगळुरु - दिल्ली दरम्यान धावणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसमध्ये सुरु केली आहे. येत्या काळात ही सेवा 26 रेल्वे गाड्यांमध्ये दिली जाणार आहे. त्यामध्ये 100 पीओएस मशिन दिल्या जाणार आहेत.
- आयआरसीटीसी पीओएस मशीन देण्यासोबतच योग्य पद्धतीने काम होत आहे की नाही हे तपासण्यासाठी रेल्वेमध्ये अधिकारी नियुक्त करणार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.