आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

100 वर्षांपूर्वी अशी दिसत होती दिल्ली, यामुळे करण्यात आली राजधानी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
1895 मध्ये दिल्लीतील काश्मीरी गेट. - Divya Marathi
1895 मध्ये दिल्लीतील काश्मीरी गेट.

नवी दिल्ली - दिल्ली ही भारताची राजधानी आहे हे सर्वांनाच माहित आहे. मात्र दिल्लीला देशाची राजधानी केव्हा घोषित करण्यात आले हे फार कमी लोकांना माहित असेल. 13 फेब्रुवारी 1931 मध्ये दिल्लीला भारताची राजधानी करण्यात आले होते. याची घोषणा 12 डिसेंबर 1911 ला पंचम जॉर्जने केली होती. शेवटचा मुघल बादशाह बहादुर शाह जफर याच्या नंतर 1857 ला देशाच्या राजधानीचा दर्जा कलकत्ता शहराला मिळाला होता. मुघल साम्राज्यात दिल्ली येथूनच देशाचा कारभार चालवला जात होता. 

 

दिल्लीला म्हणायचे इंद्रप्रस्थ 
- असे म्हटले जाते की 1450 मध्ये पांडवांनी दिल्लीला वसवले होते. 
- दिल्लीवर मोहम्मद घौरी, अल्लाउद्दीन खिलजी, अकबर अशा अनेक शासकांनी राज्य केले. 
- पांडवांच्या काळात दिल्लीला इंद्रप्रस्थ म्हटले जात होते. 
- इंग्रजांनी दिल्लीला राजधानी घोषित करण्याचे प्रमुख कारण म्हणजे दिल्लीत राहून देशावर राज्य करणे सहज शक्य होते. मुघल साम्राज्यातही दिल्लीच राजधानी होती. येथूनच मुघलांनी आपल्या साम्राज्याचा विस्तार केला होता. 

 

अनेक राजे-महाराजे आले होते 
- इंग्रजांनी 1911 मध्ये निर्णय केला की भारताची राजधानी दिल्ली करायची. त्याआधी कलकत्ता (आताचे कोलकाता) येथून शासन चालवले जात होते. 
- दिल्लीला देशाची राजधानी करण्याचा निर्णय पंचम जॉर्ज यांनी घेतला होता. 80 हजार लोकांच्या उपस्थितीत दिल्लीत त्यांनी ही घोषणा केली होती. 
- यासाठी दिल्ली बाहेर बुराडी येथे दिल्ली दरबार भरवण्यात आला होता. या दरबारात देशातील अनेक राजे-महाराजे, महाराणी यांना निमंत्रित करण्यात आले होते. 

 

दिल्लीबद्दल...
- दिल्लीमध्ये चांदनी चौक, पालिका बाजार, कॅनॉट प्लेस, बल्लीमारान, दिल्ली हाट अशी अनेक ठिकाणे प्रसिद्ध आहेत. 
- दिल्लीमध्ये कलाप्रेमींसाठी अनेक संग्रहालये देखील आहेत. त्यात राष्ट्रीय संग्रहालाय, राष्ट्रीय रेल्वे संग्रहालय, पुरातत्व संग्रहालय, स्वातंत्र्यसैनिक संग्रहालय, गांधी स्मृती, हस्त-शिल्पकला, भारतीय युद्ध संग्रहालय आहेत. 
- दिल्लीच्या आसपास अनेक धार्मिक स्थळे आहेत. अक्षरधाम मंदिर, गुरुद्वारा बंगला साहिब, कालकाजी मंदिर, लोटस टेम्पल, संकट हरणी मंगल करणी शक्तिपीठ, झंडेवाला देवी मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर, निजामुद्दीन दर्गा आहेत. 
- दिल्लीमध्ये अनेक ऐतिहासिक स्थळ आहेत. उदाहरणार्थ - इंडिया गेट, कुतुब मिनार, जंतर मंतर, संसद भवन, लाल किल्ला, हुमांयूचा मकबरा, जामा मशिद, राजघाट, नसिरुद्दीन महमूद चा मकबरा, लोदी बाग, राजपथ. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, कशी दिसत होती दिल्ली... 

बातम्या आणखी आहेत...