आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंडिगो - जेटच्या फ्लाइटमध्ये मच्छर: डॉक्टरचा आरोप- तक्रार केली तर स्टाफने मारहाण करुन उतरुन दिले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंडिगो आणि जेट विमानांमध्ये मच्छर असल्याची तक्रार आली आहे. - Divya Marathi
इंडिगो आणि जेट विमानांमध्ये मच्छर असल्याची तक्रार आली आहे.

नवी दिल्ली - इंडिगो फ्लाइटमध्ये मच्छरांची तक्रार करणाऱ्या एका प्रवाशासोबत क्रू मेंबरने गैरवर्तन केल्याचे प्रकरण मंगळवारी समोर आले आहे. लखनऊ विमानतळावर एका डॉक्टर प्रवाशाने मच्छरांची तक्रार केली, तेव्हा क्रू मेंबर्सने प्रवाशाला मारहाण करत खाली उतरवून दिले. हे फ्लाइट बंगळुरुला जात होते. इंडिगोने आपल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे, की प्रवाशाचे वर्तन योग्य नव्हते. दुसरीकडे, जेट फ्लाइटमध्येही मच्छराचा व्हिडिओ समोर आला आहे. जेट एअरवेजने या व्हिडिओची सत्यता पडताळून पाहाणार असल्याचे म्हटले आहे. 

 

प्रवाशाची काय तक्रार होती? 
- इंडिगोचे प्रवाशी डॉ. सौरभ राय हे लखनऊहून बंगळुरुला निघाले होते. त्यांनी क्रू मेंबर्सवर मारहाणीचा आरोप केला आहे. 
- राय म्हणाले, 'इंडिगो फ्लाइटमध्ये मच्छरांनी भरलेले होते. याची जेव्हा तक्रार केली तेव्हा स्टाफने मला मारहाण केली. त्यानंतर मला ओढत विमानातून खाली आणले गेले. त्यासोबतच स्टाफकडून मला धमक्या देण्यात आल्या.'

 

इंडिगोने आरोपावर काय म्हटले? 
- इंडिगो एअरलाइन्सने त्यांच्यावर झालेल्या आरोपावर स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, 'सौरभ रायने बंगळुरुला जाणाऱ्या फ्लाइट क्रू मेंबर्ससोबत गैरवर्तन केले. त्यानंतर त्यांना फ्लाइटमधून खाली उतरवण्यात आले. त्यांनी विमानात मच्छर असल्याची तक्रार केली होती. क्रू मेंबर्स कारवाई करतील तोपर्यंत ते संतप्त झाले आणि धमकीवजा भाषेत बोलू लागले होते.'
- 'फ्लाइटचे दार बंद झाल्यानंतर त्यांनी फ्लाइट्समधील इतर प्रवाशांना चिथावण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही तर हायजॅक सारख्या शब्दांचा प्रयोग केला. बाकी पॅसेंजर्सच्या सुरक्षेचा विचार करुन त्यांना फ्लाइटमधून उतरवून देण्यात आले.' 

बातम्या आणखी आहेत...