आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली - इंदू मल्होत्रा यांनी शुक्रवारी सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशपदाची शपथग्रहण केली. सुप्रीम कोर्टाच्या इतिहासातील त्या पहिल्या अशा महिला आहेत ज्या वकिली करत असताना थेट सुप्रीम कोर्टात जज झाल्या आहेत. चीफ जस्टिस ऑफ इंडिया दीपक मिश्रा यांनी त्यांना शपथ दिली. त्यांचा कार्यकाळ 3 वर्षांचा असणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायाधीशांच्या कॉलेजियमने दोन नावाची केंद्र सरकारकडे शिफारस केली होती. त्यातील एक नाव इंदू मल्होत्रा यांचे होते तर, दुसरे उत्तराखंडचे मुख्य न्यायाधीश के.एम. जोसेफ यांचे होते. केंद्राने इंदू मल्होत्रा यांच्या नावाला मंजूरी देऊन जस्टिस जोसेफ यांच्या नावाचा पुनर्विचार करण्यास सांगितले आहे.
कोण आहे इंदू मल्होत्रा
- इंदू मल्होत्रा या 30 वर्षांपासून सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिस करत आहेत.
- 61वर्षीय इंदू मल्होत्रा या पहिल्या महिला आहेत ज्या वकीली करत असताना त्यांची थेट सुप्रीम कोर्ट न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
- सुप्रीम कोर्टाच्या 68 वर्षांच्या इतिहासातील त्या सातव्या महिला जज असतील. त्यांच्या आधी फातिमा बीवी, सुजाता मनोहर, रुमा पाल, ज्ञानसुधा मिश्रा, रंजना देसाई आणि भानुमती या सुप्रीम कोर्ट जज बनल्या होत्या.
- सध्या सुप्रीम कोर्टातील 24 न्यायाधीशांमध्ये आर. भानुमती या एकमेव महिला जज आहेत. आता इंदू मल्होत्रा यांच्यासह सुप्रीम कोर्टात दोन महिला जज असतील.
सुप्रीम कोर्टाच्या वरिष्ठ वकील
- इंदू मल्होत्रा यांची ऑगस्ट 2007 मध्ये सुप्रीम कोर्टाच्या वरिष्ठ वकील म्हणून नेमणूक झाली होती. या पदापर्यंत पोहोचणाऱ्या त्या दुसऱ्या महिला वकील होत्या.
दिल्लीत झाले शिक्षण
- इंदू मल्होत्रा यांचा जन्म 1956 मध्ये बंगळुरुत झाला. त्यांनी दिल्लीतील लेडी श्रीराम कॉलेज आणि दिल्ली विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले. इंदू मल्होत्रा यांनी राज्यशास्त्रातून पदव्यूत्तर पदवी संपादन केली होती.
- दिल्लीतील विवेकानंद कॉलेज, मिरांडा हाऊस महाविद्यालय येथे त्यांनी प्राध्यापक म्हणूनही काम केले होते.
- इंदू मल्होत्रा यांनी 1983 मध्ये वकिली कारकिर्दीस सुरुवात केली. त्यांचे संपूर्ण कुटुंब वकिली करते.
- मल्होत्रा यांचे वडील ओ.पी.मल्होत्रा ज्येष्ठ वकील आहे. त्यांचा मोठा भाऊ आणि बहिणही वकील आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.