आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Indu Malhotra, The First Woman Lawyer To Be Directly Judged In The Supreme Court

थेट सुप्रीम कोर्टात जज होणाऱ्या इंदू मल्होत्रा पहिल्या महिला वकील

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- ज्येष्ठ वकील इंदू मल्होत्रा सुप्रीम कोर्टात थेट न्यायमूर्ती म्हणून नियुक्त होणाऱ्या  पहिला महिल्या वकील ठरतील. सुप्रीम कोर्ट कॉलेजियमने मल्होत्रा यांच्यासह उत्तराखंड हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती के. एम. जोसेफ यांचीही सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस केली आहे. न्या. जोसेफ यांनी केंद्र सरकारने उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केल्यानंतर तो निर्णय रद्दबातल ठरवला होता.


सध्या सुप्रीम कोर्टात न्या. आर. भानुमती या एकमेव महिला जज असून इंदू मल्होत्रा स्वातंत्र्यानंतर सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती होणाऱ्या सातव्या महिला आहेत.  १९८९ मध्ये न्या. एम. फातिमा बीबी यांची सुप्रीम कोर्टाने पहिल्या महिला जज म्हणून 
नियुक्ती केली होती. त्यानंतर न्या. सुजाता व्ही. मनोहर, न्या. रुमा पाल, न्या. ज्ञानसुधा मिश्रा आणि न्या. रंजना प्रकाश देसाई सुप्रीम कोर्टात महिला जज होत्या.

बातम्या आणखी आहेत...