आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - इयत्ता चौथीमध्ये शिकणाऱ्या 11 वर्षांच्या बालकाचे अपहरण करून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आले व नंतर गळा दाबून त्याची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. गळा दाबूनही आरोपीला बालकाचा मृत्यू झाल्याची खात्री पटली नाही म्हणून त्याने दगडाने चेहऱ्याचा चेंदामेंदा केला. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीची ओळख पटवून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. शनिवारी अपहरण 3 वाजता बालक घराबाहेर खेळत होते. यादरम्यान तो घराजवळील एका मंदिरातून पाणी आणण्यासाठी गेला. तेथे आरोपीने त्याला आमिष दाखवून सोबत नेले.
असे आहे पूर्ण प्रकरण...
थोड्या वेळाने जेव्हा घरी परतला नाही, तेव्हा कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. परंतु त्याचा काही ठावठिकाणा लागला नाही. यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार नोंदवली. सूचना मिळताच पोलिसांनी परिसरात लागलेले सीसीटीव्ही फुटेज शोधणे सुरू केले. यात एक तरुण चिमुकल्याला घेऊन जाताना दिसला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेतला.
एका गुप्त सूचनेवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली. आरोपीने पोलिसांना सांगितले की, घटनेनंतर त्याने बालकाचा मृतदेह भलस्वा डेअरी येथील गोल्फ कोर्स ग्राउंडच्या झुडपात फेकून दिले होते. पोलिसांनी त्याने दाखवलेल्या जागेवरून मृतदेह हस्तगत केला. पोस्टमॉर्टम झाल्यावर कुटुंबीयांना मृतदेह सोपवण्यात आला आहे. बालक हैदरपूरमध्ये राहत होते. कुटुंबात आई-वडील आणि बहीण आहे. तो पीतमपुरा येथील सरकारी शाळेत इयत्ता चौथीत शिकत होता. वडील एका खासगी कंपनीत काम करतात.
असा लागला छडा...
चिमुकला हरवल्याची माहिती मिळताच त्याच्या कुटुंबीयांनी परिसरात शोधाशोध केली, परंतु त्याची काहीच माहिती मिळाली नाही. तेव्हा त्याच्यासोबत खेळणाऱ्या काही मुलांनी त्या व्यक्तीच वर्णन सांगितले, ज्याने बालकाला सोबत नेले होते. पोलिसांनी परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला अटक केली. चौकशीत आरोपीने गुन्हा कबूल केला.
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या धक्कादायक घटनेची इन्फोग्राफिक माहिती...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.