आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी कच्चा तेलाच्या किंमती मोदी सरकारची डोकेदुखी ठरत आहेत. ब्रेंट क्रूडची किंमत डिसेंबर 2014 नंतर प्रथमच प्रति बॅरल 70 डॉलरच्या पुढी गेली आहे. या वाढत्या दरांचा परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीवर होणार हे निश्चित आहे. सोमवारी दिल्लीत पेट्रोल 71 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 61.74 रुपये प्रति लिटरवर पोहोचले. पेट्रोल-डिझेल महागल्याने सामान्य माणसांवर महागाईचा बोजा वाढणार आहे.
क्रूड ऑइल दराने पार केली डॉलरची सत्तरी
- क्रूड ऑइल दरांच्या वृद्धीने तेल आयात करणाऱ्या देशांची चिंता वाढली आहे. सोमवारी ब्रेंट क्रूडच्या किंमतीमध्ये वाढ होऊन हे दर प्रति बॅरल 70 डॉलरवर गेले आहेत. गेल्या तीन वर्षातील ही सर्वात मोठी वाढ आहे. गेल्या 6 महिन्यात क्रूड ऑइलच्या दरात 57% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. जूनमध्ये क्रूडचा दर 44.48 डॉलर प्रति बॅरेल असा होता.
3 ऑक्टोबर नंतर पेट्रोल-डिझेलचे दर
पेट्रोल | ड्यूटी कमी झाल्यानंतर | सध्या |
दिल्ली | 68.38 | 71.18 |
मुंबई | 77.51 | 79.06 |
कोलकाता | 71.16 | 73.91 |
चेन्नई | 70.85 | 73.80 |
डिझेल | ड्यूटी कमी झाल्यानंतर | सध्या |
दिल्ली | 56.89 | 61.74 |
मुंबई | 60.43 | 65.74 |
कोलकाता | 59.55 | 64.40 |
चेन्नई | 59.89 | 65.08 |
का वाढत आहे क्रूडचे दर
- तज्ज्ञांच्या मते ओपेक (OPEC) देशांच्या शिवाय रशियाने तेल उत्पादन कमी केल्याने मार्केटमध्ये पुरवठा कमी होत आहे. तर काही दिवसांपासून यूएसएमध्येही रिग्ज काऊंड कमी झाली आहे. यामुळे मार्केटमध्ये ओव्हरबॉटची स्थिती निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम क्रूडचा दरांवर झाला आहे. त्यामुळे ब्रेंट क्रूडचा दर 70 डॉलरवर पोहोचला आहे. तर डब्ल्यूटीआय क्रूडचा दरही 64.53 डॉलरवर पोहोचला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.