आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनियांची जागा घेणार राहुल, जाणून घ्या अमित शहांच्या तुलनेत काय आहे स्थिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - राहुल गांधी यांची सोमवारी काँग्रेसच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. काँग्रेस अत्यंत कठीण परिस्थितीतून जात असताना राहुल गांधी यांच्याकडे अध्यक्षपदाची सुत्रे आली आहेत. त्यामुळे काँग्रेस यातून बाहेर काढण्याचे मोठे आव्हान राहुल यांच्यासमोर असणार आहे. त्यात नरेंद्र मोदी आणि अमित शहांसारख्या मुरब्बी नेत्यांना त्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे राहुल यांच्यासमोरचे आव्हान डोंगरासारखे आहे यात शंका नाही.   


आमित शहांशी सामना 
- 132 वर्षे जुन्या काँग्रेसने त्यांचे नवे अध्यक्ष निवडले. 47 वर्षांचे राहुल गांधी बिनविरोध अध्यक्ष निवडले गेले होते. 
- पण ते काँग्रेसचे सर्वात तरुण अध्यक्ष नाहीत. राजीव गांधी वयाच्या 40 व्या वर्षीच अध्यक्ष बनले होते. 
- राहुल 5 वर्षांपूर्वी सक्रिय राजकारणात आले. 2012 मध्ये काँग्रेसने त्यांच्या नेतृत्त्वात युपीतील निवडणुकाही लढल्या. 
- तेव्हापासून आतापर्यंत राहुल यांनी 36 निवडणुकांमध्ये पक्षाचे नेतृत्त्व केले. 
- अमित शहा 2014 लोकसभा निवडणुकीच्या काळात सक्रिय राजकारणात आले होते. नंतर ते भाजपाध्यक्ष बनले. 

 

पुढील स्लाइडवर पाहा, राहुल गांधींसमोरील आव्हाने यासंदर्भातील व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...