आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • शेजारी म्हणाला व्हॉट्सअॅपवर आलाय तुमच्या मुलीचा व्हिडिओ Daughter Reveal Her Shocking Story To Mother In Delhi, Rohini

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेजारी म्हणाला- व्हॉट्सअॅपवर आलाय तुमच्या मुलीचा व्हिडिओ, मग आईने विचारले मुलीला \'सत्य\'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - राजधानीच्या रोहिणी परिसरात एका विद्यार्थिनीवर रेप करून त्याचा व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड केल्याचे खळबळजनक प्रकरण समोर आले आहे.  पोलिसांनी आरोपीला मंगळवारी अटक केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आईने मुलीच्या रेपचा व्हिडिओ आपल्या मोबाइलपवर पाहिला होता, यानंतर तिने मुलीला जाब विचारल्यावर तिने रडतच त्या भयंकर घटनेची हकिगत सांगितली.

 

असे आहे पूर्ण प्रकरण... 
- 12 वर्षीय विद्यार्थिनीवर शेजारी राहणाऱ्या 32 वर्षीय अनिल ऊर्फ बंटीने बलात्कार केला होता. तो विवाहित असून दोन मुलांचा बाप आहे.
- दोन महिन्यांपूर्वी बंटीने पीडितेला बहाण्याने आपल्या घरी बोलावले आणि धमकी देऊन-भीती घालून बलात्कार केला. दरम्यान, आरोपीच्या मित्रांनी या बलात्काराचा व्हिडिओ शूट केला.
- आरोपी हा व्हिडिओ इंटरनेटवर टाकण्याची धमकी देऊन तिचे लैंगिक शोषण करत राहिला. परंतु, काही दिवसांपूर्वी त्याने रेपचा व्हिडिओ व्हॉट्सअॅप आणि इंटरनेटवर टाकला.

 

आईने आपल्या मोबाइलवर मागवला व्हिडिओ...
- तब्बल दोन महिने पीडित मुलगी घाबरून गप्प राहिली. मागच्या रविवारी एका शेजाऱ्याने मुलीच्या रेपचा व्हिडिओ आपल्या व्हॉट्सअॅपवर आलेला पाहून याची माहिती आईला दिली.  
- आईने आपल्या व्हॉट्सअॅप नंबरवर रेपचा व्हिडिओ मागवून पाहिले असता तिच्या पायाखालची वाळूच सरकली. हा व्हिडिओ तिच्याच मुलीवरील बलात्काराचा होता.
- आईने आपल्या मुलीला याबाबत विचारले असता तिने रडत-रडतच आपल्यावरील बलात्काराची आपबीती सांगितली. यानंतर पोलिसांत रिपोर्ट दाखल करण्यात आली.
- व्हिडिओमध्ये आरोपीला स्पष्ट पाहिले जाऊ शकते. यानंतर त्याला लगेच अटक करण्यात आली.

 

पुढच्या स्लाइड्सवर, इन्फोग्राफिकमधून पाहा पूर्ण घटनाक्रम... 

बातम्या आणखी आहेत...