आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हत्येच्या गुन्ह्यात 'धोनी'ला अटक, बॅटने खून करून झाला होता फरार; असा झाला उलगडा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली-  'धोनी' नावाने प्रसिद्ध क्रिकेटपटू विजय कुमार याला पोलिसांनी अटक केली आहे. विजय कुमार 2011 पर्यंत जिल्हास्तरीय क्रिकेट खेळला आणि महेंद्रसिंग धोनीपासून प्रेरित होऊन त्याने त्याच्यासारखी हेअरस्टाइल केली. या कारणामुळे क्लब क्रिकेट सर्किटमध्ये त्याला धोनी नावाने ओळखले जाऊ लागले. तथापि, दिल्लीतील क्रिकेट संघात न घेतल्याने 'धोनी'ने गँगस्टर गौरव झरेडाची गँग जॉइन केली होती.

 

अशी झाली अटक

> एका दैनिकाच्या रिपोर्टनुसार, गौरव झरेडाची गँग दिल्ली कँटमध्ये अनेक गुन्ह्यांसाठी बदनाम आहे. पोलिसांनी विजय ऊर्फ धोनीला द्वारकामधून रविवारी अटक केली. त्याच्यावर दिल्ली कँटमध्ये 2016 मध्ये एक खून केल्याचा आरोप आहे. त्याचा मोठा भाऊ विशालही गुन्हेगार आहे. पोलिसांनी रविवारी विशाललाही अटक केली आहे.
> द्वारकाचे DCP शिबेश सिंह म्हणाले, विजय 2011 पर्यंत क्रिकेट खेळला आणि आपल्या मोठ्या केसांमुळे तो क्रिकेट क्षेत्रात धोनी नावाने प्रसिद्ध झाला. तथापि, त्याची आर्थिक परिस्थिती ठीक नव्हती. अनेकदा प्रयत्न करूनही तो दिल्लीच्या संघात सामील होऊ शकला नाही. शेवटी चिडून त्याने बॉडी बनवणे सुरू केले, मग आपल्या मोठ्या भावाच्या गँगमध्ये सामील झाला. विशाल त्यापूर्वीच गँगचा अॅक्टिव्ह मेंबर होता.

> पोलिस म्हणाले, विजय आणि विशाल दोघांनी आपल्या साथीदारांसह मिळून 17 जुलै 2016 रोजी एका व्यक्तीचा लोखंडी रॉड आणि बॅटने खून केला होता. दोघे मागच्या वर्षभरापासून जागा आणि मोबाइल बदलत होते.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या घटनेची इन्फोग्राफिक माहिती...

बातम्या आणखी आहेत...