आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिमुकली म्हणाली- मम्मी, काका रोज \'तसा टच\' करतात, कधीकधी खोलीत नेऊन \'ते\' करतात..

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - शाळेत शिक्षिकांनी लहानग्या मुलींना गुड टच आणि बॅड टच समजावून सांगितला. यानंतर घरी येऊन मुलींनी आईला सांगितले की, काका (वय 32) आम्हाला रोज तसा स्पर्श करतात. वास्तविक, नराधम काका निरागस मुलींची मागच्या 6 महिन्यांपासून छेडछाड करत होता. ही घटना सेंट्रल दिल्लीच्या चांदनी महाल परिसरातील आहे. पोलिसांनी आईच्या तक्रारीवरून पॉक्सो अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपी सचिनला अटक केली आहे.

पोलिसांच्या मते, 5 आणि 8 वर्षीय दोन सख्ख्या बहिणी कुटुंबासह चांदनी महाल परिसरात राहतात. दोघीही सरकारी शाळेत शिकतात. शेजारच्या घरात सचिन नावाचा तरुण राहतो, तो मुलींचा काका आहे.

 

असे आहे पूर्ण प्रकरण..

> गत बुधवारी मुली शाळेतून घरी परतल्या. आईला त्यांनी सांगितले की, आज शिक्षकांनी आम्हाला गुड टच आणि बॅड टचबाबत माहिती दिली. यानंतर दोघींनी आईला म्हटले की, असाच बॅड टच काका रोज खोलीत बोलावून आमच्यासोबत करतात. निरागस मुली म्हणाल्या, काका कधीकधी पूर्ण अंगावरून घाणेरडा हात फिरवतात. कधीकधी खूप वाईट काम करतात. नंतर चॉकलेट नाहीतर कँडी देतात.

> मुलींचे म्हणणे ऐकून आईच्या पायाखालची जमीनच सरकली. एवढा तिला धक्का बसला होता. तिने ही गोष्ट आपल्या पतीला सांगितली. यानंतर पोलिसांना कळवण्यात आले. पोलिसांनी पॉक्सो अॅक्टनुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. सूत्रांनुसार, आरोपी नशेखोर असल्याचे समोर आले.

 

आरोपी काकाला 6 महिन्यांत फाशी द्यावी : महिला आयोग
दिल्ली महिला आयोगाने (डीसीडब्ल्यू) याप्रकरणी आरोपी काकाविरुद्ध कडक कारवाईची मागणी केली आहे. आयोगाने आरोपीला 6 महिन्यांच्या आत फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या घटनेचे आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...