आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • पतीने आधी पत्नीचा गळा चिरला, मेली नाही म्हणून फासावर लटकवले; श्वास सुरू होते म्हणून घरातच गाडले Husband Murdered His Wife In Delhi

पतीने आधी पत्नीचा गळा चिरला, मेली नाही म्हणून फासावर लटकवले; श्वास सुरू होते म्हणून घरातच गाडले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अवैध संबंधांमुळे पतीने आपल्या पत्नीची हत्या केली. पतीने आधी धारदार शस्त्राने पत्नीचा गळा चिरला, तरीही ती मेली नाही म्हणून त्याने ओढणीने गळफास लावून तिला फासावर लटकवले आणि त्यानंतरही तिचे श्वास सुरू असल्याचे पाहून घरातच खड्डा खोदून दफन केले. मृत विवाहिता सविता 32 वर्षे वयाची होती. ही घटना मंगळवारी दुपारी 1.10 वाजता नॉर्थ दिल्लीत घडली.   

 

असे आहे प्रकरण... 

- पोलिसांनी मृतदेह खड्ड्यातून काढून पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. हत्येच्या कलमांमध्ये गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपी रोहित ऊर्फ बागेश्वर (36) याला दोन तास शोध घेतल्यावर अटक केली.

- चौकशीत आरोपी म्हणाला की, त्याच्या पत्नीचे एका तरुणाशी अवैध संबंध होते. यामुळेच त्याने तिची एवढी निर्घृण हत्या केली. पोलिसांनी सविताच्या कुटुंबीयांना याची माहिती दिली आहे.

- पोलिस म्हणाले, पाटण्यातील रहिवासी सविता आणि रोहितचे लग्न 13 वर्षांपूर्वी झाले होते. त्यांना दोन मुले आहेत. मोठा मुलगा 10, तर लहान मुलगा 8 वर्षांचा आहे.
- ते सराय रोहिल्ला येथे राहायचे आणि टँक रोडवरील एका कारखान्यात काम करायचे.

मुलांना बहिणीच्या घरी नेऊन सोडले, हत्येनंतर पळून जाणार होता
- आरोपीने पोलिसांना सांगितले की, सोमवारी रात्री त्याने पत्नीला समजावले की, तू मुलांवर लक्ष दे. यानंतर दोघांमध्ये तिच्या अवैध संबंधांवरून कडाक्याचे भांडण झाले. यानंतर त्याने पत्नीचा काटा काढण्याचा प्लॅन बनवला.
- मंगळवारी सकाळ होताच तो दोन्ही मुलांना ओखलामध्ये राहणाऱ्या बहिणीच्या घरी घेऊन गेला. त्यांना तेथे सोडून सकाळी 10.30 वाजता पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह घरातच पुरला.
- हत्येनंतर तो बिहारला पळून जाण्याच्या बेतात होता. पोलिस त्याच्या दोन्ही मुलांचीही चौकशी करत आहेत की, घटनेच्या वेळी ते कुठे होते.

 

चहावाल्याला मातीतून दिसला महिलेचा पाय...
- सविताच्या शेजारी शत्रुघ्न सिंह यादव हा चहाविक्रेता राहतो. तो म्हणाला की, सविता दररोज सकाळी 5.30 दरम्यान जागे व्हायची. दोन्ही मुलांना शाळेत पाठवून ती कामावर जायची.
- घटनेच्या दिवशी तिच्या घराचे दार बंद पाहून त्याने विचार केला की, सर्व झोपलेले असतील. दुपारी 12 वाजताही दार उघडले नाही, तेव्हा त्याने झोपडीत जाऊन पाहिले तर मातीत दबलेला पायाचा अंगठा दिसत होता.
- थोडीशी माती बाजूला सारल्यावर त्याला धक्काच बसला. यानंतर त्याने लगेच शेजाऱ्यापाजाऱ्यांना गोळा करून पोलिसांना कॉल केला.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या प्रकरणाचे इन्फोग्राफिक्स...

बातम्या आणखी आहेत...