आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - आयआयटी दिल्लीत 21 वर्षीय विद्यार्थी गोपाल मालोने गुरुवारी रात्री उशिरा नीलगिरी होस्टेलच्या आपल्या रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. पश्चिम बंगालच्या हुबळीतील रहिवासी मालो एमएस्सी केमिस्ट्रीचा प्रथम वर्षाचा विद्यार्थी होता. त्याने 10 एप्रिल रोजी झोपेच्या तब्बल 50 गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु मित्रांनी त्याला वेळेवर रुग्णालयात दाखल केल्याने तो वाचला होता. मालो गुरुवारीच रुग्णालयात होस्टेलमध्ये परतला होता. यानंतर त्याने त्याची रूम डी-5 मधून दोन्ही रूममेट्सना बाहेर काढले आणि गळफास लावला.
असे आहे प्रकरण...
शुक्रवारी सकाळी जेव्हा मित्रांनी दार ठोठावूनही रूमचे दार उघडले नाही, तेव्हा या घटनेची माहिती मिळाली. पोलिसांनी मालोच्या रूममध्ये बंगालीमध्ये लिहिलेली सुसाइड नोट हस्तगत केली. ज्यात लिहिले आहे की, त्याचा मामा आणि मावशी मुलाने 11 वर्षांपासून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले आहेत आयआयटीमध्ये आल्यानंतरही ते त्याच्यावर परत बंगालला येण्याचा दबाव टाकू लागले. त्याला हे सर्व सहन होत नव्हते.
'बॅड टच' अन् 'गुड टच'बद्दल मुलांना वेळीच पालकांनी शिकवणे गरजेचे, ही आहे योग्य पद्धत
पप्पा, भय्या-वहिनी, मी सर्वांची माफी मागतो...
मी माझ्या मर्जीने माझा जीव देत आहे, परंतु माझ्यासोबत खूप वाईट झाले आहे. जेव्हा मी 11 वर्षांचा होतो तेव्हा माझ्या मावशीच्या मोठा मुलाने माझ्यावर कुकर्म केले, यानंतर माझ्या मामाच्या मुलानेही माझे शारीरिक शोषण केले. दोघांनी लगातार अनेक वर्षे माझ्यावर अत्याचार केले. मी लहान होतो म्हणून मला याची माहिती नव्हती. आणि मला याची सवय झाली. परंतु मी जेव्हा दिल्लीला आलो तेव्हा मला कळले की, हे चुकीचे आहे. यामुळे आता एवढे सगळे घडल्यावर मी जिवंत राहू शकत नाही. परंतु माझी अंतिम इच्छा आहे की, माझ्या मामा व मावशीच्या मुलांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी. आई, बाबा, भाऊ, वहिनी आणि लहान भाऊ तुमची सर्वांची मी माफी मागतो. परंतु मी मागच्या काही दिवसांपासून खूप त्रस्त होतो, यामुळे माझा जीव देत आहे.
रात्री मित्रांना काढले होते रूमबाहेर
नीलगिरी होस्टेलच्या रूम नंबर डी-5 मध्ये 3 कॉट आहेत. मधल्या कॉटवर गोपाल मालो झोपायला. गुरुवारी रात्री त्याचे सोबत झोपत नव्हते तेव्हा त्याने झोपण्याच्या बहाण्याने त्यांना रूमबाहेर काढले आणि आतून दार बंद करून घेतले. गोपालचे दोन्ही मित्र रात्रभर बाहेरच झोपले आणि सकाळी 7 वाजता रूमबाहेर पोहोचले. अनेकदा दार ठोठावूनही गोपालने उघडले नाही, म्हणून एका मित्राने खिडकीतून डोकावून पाहिले. तेव्हा त्याला गोपाल पंख्याला लटकलेला आढळला. यानंतर लगेच त्यांनी सिक्युरिटी गार्डला माहिती कळवली. सिक्युरिटी गार्डनी तरुणांच्या सूचना पडताळून पोलिसांनी माहिती कळवली.
पश्चिम बंगाल पोलिसही करणार प्रकरणाची चौकशी
दिल्ली पोलिसांनी सांगितले, गोपाल आपल्यावरील अत्याचारांमुळे त्रस्त होता. सुसाइड नोटमध्ये गोपालने आपल्या दोन्ही नातलगांचा उल्लेख केला आहे. त्यांच्याविरुद्ध झीरो एफआयआर नोंदवून बंगाल पोलिसांना चौकशीसाठी प्रकरण दिले जाईल. यामुळे आरोपींना कठोरात कठोर शासन दिले जाईल. लवकरच संबंधित आरोपींचीही चौकशी होईल.
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, प्रकरणाशी संबंधित इन्फोग्राफिक्स...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.