आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुप्रीम कोर्टातील 4 न्यायमूर्ती ज्यांच्याबाबत बोलले, जाणून घ्या त्या चीफ जस्टिस दीपक मिश्रांबाबत..

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सुप्रीम कोर्टातील जस्टिस जे. चेलमेश्वर, जस्टिस रंजन गोगोई, जस्टिस मदन भीमराव लोकुर आणि जस्टिस कुरियन जोसफ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतल्याने देशभरात खळबळ उडाली आहे. सुप्रीम कोर्टाच्या इतिहासात असे पहिल्यांदाच झाले जेव्हा की, सीनियर न्यायाधीशांनी मीडियासमोर गाऱ्हाणे मांडले. ते म्हणाले की, सुप्रीम कोर्टात काहीच ठीक सुरू नाहीये. आम्हाला ज्या अडचणी आल्या होत्या, त्या चीफ जस्टिस यांना सांगितल्या आहेत. हे न्यायाधीश असेही म्हणाले की, "आता हे देशालाच ठरवायचे आहे की, मुख्य न्यायाधीशांवर महाभियोग आणला पाहिजे की नाही..."     


काय म्हणाले न्यायमूर्ती...
> ही एक खास वेळ आहे. भारताच्या इतिहासात असे कधीही झालेले नाही.
> गेल्या काही महिन्यांपासून सुप्रीम कोर्टाचे प्रशासन योग्य काम करत नसल्याचे दिसत आहे. 
> याप्रकरणी आम्ही सरन्यायाधीशांकडेही म्हणणे मांडले, पण त्याचा फायदा झाला नाही. 
> त्यामुळे आम्हाला ही पत्रकार परिषद आयोजित करावी लागली आहे. 
> आम्हाला देशातील जनतेला सर्वकाही सांगायचे आहे.
> न्यायव्यवस्था टिकली नाही तर लोकशाही टिकणार नाही. 
> यापूर्वी न्यायव्यवस्थेत अशा प्रकारच्या गोष्टी घडल्या नाहीत
> खटल्यांच्या वाटपाबाबत काही तक्रारी आहेत. आम्ही दिलेल्या पत्रामध्ये आमचे म्हणणे मांडले आहे, असे गोगोई म्हणाले. 
> सीबीआयचे जज लोया प्रकरणाशी हे संबंधित आहे का असे विचारले असता, लोयांनी हो असे उत्तर दिल्याचे न्यूज एजन्सीने म्हटले आहे.

 

सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांच्या या वक्तव्याचा थेट रोख मुख्य न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्याकडे आहे.

 

जाणून घ्या, मुख्य न्यायाधीश (CJI) दीपक मिश्रा केव्हा-केव्हा चर्चेत आले... 

बातम्या आणखी आहेत...