आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइस्लामाबाद/नवी दिल्ली - पाकिस्तानने आरोप केला आहे की, कुलभूषण जाधव यांच्या पत्नीचे बूट वापस न करण्याचे कारण म्हणजे या बुटात हेरगिरीला मदत करणारे काही सामान लावलेले असण्याची शक्यता आहे. यात कॅमेरा किंवा चीप सारखे काही तरी असू शकते. त्यामुळे ते तपासण्यासाठी पाकिस्तानने जाधव यांच्या पत्नीचे शूज फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले आहेत.
जाधव सुमारे दोन वर्षांपासून तुरुंगात आहेत. त्यांना पाकच्या लष्करी कोर्टाने हेरगिरीच्या आरोपात मृत्यूदंडची शिक्षा सुनावली आहे. इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टीसने या फाशीवर स्थगिती लावली आहे. जाधव यांच्या आई आणि पत्नीने सोमवारी इस्लामाबादेत त्यांची भेट घेतली होती.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचा घाणेरडा आरोप
- भारताने मंगळवारी आरोप केला होता की, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयात जाधव यांच्या पत्नी आणि आई यांना अत्यंत वाईट वागणूक देण्यात आली. जाधव यांच्या पत्नीचे मंगळसूत्र, बांगड्या, बूट आणि अगदी टिकलीही काढायला लावली. बूट तर परतही दिले नाहीत.
- 'जियो न्यूज' च्या मते पाकिस्तान फॉरेन मिनिस्ट्रीचे प्रवक्ते मोहम्मद फैजल यांनी म्हटले, जाधव यांच्या पत्नीचे बूट परत न देण्याचे कारण म्हणजे त्यात हेरगिरी करणारे काही विदेशी (उपकरण) लावलेले असू शकते. आमच्या संस्था याची चौकशी करत आहेत.
- फैजलने म्हटले की, पाकिस्तानच्या तपास संस्थांनी केवळ त्यांचे बूट ठेवून घेतले आहेत. दागिने, शॉल अशा इतर वस्तू मात्र परत केल्या आहेत. फैजल म्हणाले की, त्यांच्या बुटामध्ये काहीतरी लावलेले असू शकते. त्यामुळे ते तपासणे गरजेचे आहे.
बुटांमध्ये कॅमेरा तर फिट केलेला नाही?
पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार जाधव यांच्या पत्नीने जे बूट परिधान केलेले होते, त्यात काहीतरी मेटालिक ऑब्जेक्ट लावलेले आहे. तपास संस्थांना शंका आहे की, हे हायपर सेंसिटिव्ह कॅमेरा किंवा असेच दुसरे काही लावलेले असू शकते.
पुढील स्लाइड्वर वाचा, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी या भेटीबद्दल काय म्हटले होते...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.