आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोट्यवधींच्या प्रॉपर्टीची मालकीन आहे ही लेडी डॉन; केंद्रीय मंत्र्याला करत होती ब्लॅकमेल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- राजधानीची लेडी डॉन आणि सेक्स रॅकेटची सूत्रधार सोनू पंजाबन हिला पोलिसांनी पुन्हा एकदा जेरबंद केले आहे. एका केंद्रीय मंत्र्याला ब्लॅकमेल केल्याचा तिच्यावर आरोप आहे. याशिवाय तिने एका अल्पवयीन मुलीला 20 लाख रुपयांत विकल्याचीही गोपनिय माहितीही पोलिसांना मिळाली आहे. पोलिस मागील 4 महिन्यांपासून सोनू पंजाबनच्या मागावर होते.  अखेर ‍तिला पोलिसांनी काल (रविवार) अटक केली. दरम्यान, प्रॉस्टिट्यूशनच्या गोरखधंद्यातून सोनूने कोट्यवधींची कमाई केली आहे.

 

16 वर्षीची मुलीचे केले अपहरण

- नजफगड पोलिस ठाण्यात ऑगस्ट 2014 मध्ये 16 वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल करण्‍यात आली होती. तिचे घराबाहेरून अपहरण करण्यात आले होते. 2017 मध्ये याप्रकरणाची चौकशी क्राइम ब्रँचच्या सायबरसेलने केली होती.

 

गीता अरोरा अशी बनली सोनू पंजाबन
- सोनू पंजाबन हिचे खरे नाव गीता अरोरा असे आहे. 1981 मध्ये दिल्लीतील गीता कॉलनीत तिचा जन्म झाला.
- तिचे वडील ओम प्रकाश अरोरा हे पाकिस्तानचे रेफ्यूजी होते. फाळणीनंतर ते हरियाणातील रोहतक येथे स्थायिक झाले होते.
- नंतर ते मोलमजुरी करण्यासाठी दिल्लीत आले. ऑटोरिक्षा चालवून ते गुजरान करू लागले.
- सोनू पंजाबन हिला पहिल्यांदा 31 ऑगस्ट 2007 रोजी पोलिसांनी अटक केली होती. तिला जामीन मिळाला. नंतर पोलिसांनी तिला नोव्हेंबर 2008 मध्ये पोलिसांनी पुन्हा अटक केली.
- 2003 मध्ये तिच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर ती प्रॉस्टिट्यूशनमध्ये अॅक्टिव्ह झाली होती.
- 2011 मध्ये सोनू पंजाबन हिची रवानगी तिहार तुरुंगात झाली होती.
- नोव्हेंबर 2012 मध्ये सोनू पंजाबनने तिहार तुरुंगात दोनदा आत्महत्या करण्‍याचा प्रयत्न केला होता.
- तिने आधी झोपेच्या गोळ्या खाल्ल्या तर दुसर्‍या गळफास घेण्याचा प्रयत्न केला होता.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. लेडी डॉन सोनू पंजाबनचे निवडक फोटो...

बातम्या आणखी आहेत...