आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर चुकवण्यासाठी सराफांची तस्कराकडून होतेय सोने खरेदी, अशी होते तस्करी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - शालीमार बार येथे सराफाच्या घर व दुकानातील सोने व चांदीसह १३ कोटीचा ऐवज जप्त करण्यात आला. तसेच त्या सराफाने डायरेटरेक्ट्रट ऑफ रेव्हेन्यू इंटलिजन्स(डीआरआय)च्या इमारतीच्या ६ व्या मजल्यावरून उडी टाकून आत्महत्या केली. या घटनेनंतर पुन्हा एकदा दिल्लीतील सोने तस्करीच्या अवैध व्यवसायावर  प्रश्नचिन्ह उपस्थित होते आहे. करोल बाग येथील सराफ बलवंत सिंह यांच्या मते, सराफ १० टक्के सीमा शुल्क व इतर कर वाचविण्यासाठी तस्करांकडून सोने विकत घेतात.


या देशातून येते तस्करीचे साेने
भारतात दुबई, अबुधाबी, बहारिन, कुवैत, ओमान, कतार यासारख्या आखाती देशातून तस्कर सोने आणतात.


तस्करीचे सोने आणण्यासाठी या मार्गाचा केला जातो वापर
आखाती देशातून मुंबई, कोलकाता, कोच्ची, मंगलोर व कोइम्बतूर इत्यादी ठिकाणाहून विमानतळमार्गे दिल्लीत सोने येते. दक्षिणेत आखाती देशातील पिवळ्या सोन्यास जास्त मागणी आहे. यासाठी केरळ, त्रिशूर, कोडूव्हॅली, वेंगारा, कन्नूर, तामिळनाडू, पुद्दूचेरी हे तस्कराचे बालेकिल्ले आहेत.
असा हाेतो भारतात तस्करीतून आलेल्या सोन्याचा व्यवसाय
* २०१७ मध्ये डीआरआयने देशातील विविध विमानतळावर अवैधपणे आणले जात असलेले सुमारे १४४५.०९९ किलो सोने आणि ५३६.३७ किलो चांदी पकडली.
* संघटितपणे काम करणारे मोठे सराफ गरजेनुसार, ३० टक्के सोने तस्कराकडून िवकत घेतात. तर असंघटित क्षेत्रात हे प्रमाण ५० टक्के इतके आहे. सराफ त्यांच्या खात्यात अवैधपद्धतीने घेतलेल्या सोन्यास मोडीतील सोने अशी नोंद करतात. 

 

कन्सीलमेंट एजंटाचे काम सोने बेमालूम लपवण्याचे
दुबईमध्ये कन्सीलमंेट एजंट सोने लपवण्याचे काम करतात. सोने कमी प्रमाणात असेल तर खिशात अथवा बॅगमध्ये लपवतात. जास्त असेल तर इमर्जन्सी लाइट, वॉशिंग मशीन, व्हीलचेअर, मुलांची सायकल, टीव्ही सेट आदींमध्ये ठेवतात. या कामासाठी एजंटास ३ ते ५ हजार रुपये प्रतिकिलो सोन्यामागे दिले जातात.

 

> असे समजून घ्या भारतात सोने आणण्यासाठी कसे काम करते संपूर्ण तंत्र

पहिली कडी-आखाती देश -  आखातातील देशांत हवालामार्गे व्यवसाय चालतो. मध्यस्थ हवाला ऑपरेटरच्या पैशातून सोन्याची खरेदी करतात. जर खेप मोठी झाली तर मध्यस्थाचा शोध घेतला जातो. मध्यस्थामार्फत भारतात किमतीचा सौदा ठरतो.

 

दुसरी कडी -दुबईचा कायदा 

दुबईतून सोने बाहेर नेणे कायदेशीर आहे. नेणाऱ्यास सोन्याच्या खेपेसोबत एक पावती दिली जाते. ती अधिकाऱ्यांना दाखवता यावी, असे नियोजन असते. यामुळे दुबई अथवा आखाती देशातून सोने आणणे खूप सोपे जाते. 

 

तिसरी कडी - अधिकाऱ्यांना लाच

भारतात सीमा शुल्क अधिकाऱ्यांना चकमा देऊन अथवा लाच देऊन खेप येथील लँडिंग एजंटाकडे दिली जाते. जर खेप पकडली गेली तर नुकसान हवाला ऑपरेटरचे होते. यासाठी त्याच्याकडे पैसे भरपूर असावे लागतात. 

 

चौथी कडी - कामात गुप्तता

या संपूर्ण कामात गुप्तता पाळली जाते. म्हणजे सोने नेणाऱ्या व्यक्तीची कोणासही माहिती नसते. मध्यस्थासही खरा ऑपरेटर कोण? याची माहिती नसते. नेणारा पकडला गेला तर सगळी यंत्रणा उघडकीस येऊ नये, यासाठी ही काळजी घेतली जाते.

 

 

 

पुढील स्लाईडवर वाचा,कसे पोहचते दुकानात तस्करीचे सोने​ व सराफाच्या मृत्यूची चौकशी..

 

बातम्या आणखी आहेत...