आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटनमध्ये विजय माल्ल्याची संपत्ती गोठवली, आठवड्याला खर्चासाठी मिळणार 4.35 लाख रुपये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन/नवी दिल्ली - फरार व्यावसायिक विजय माल्ल्याची ब्रिटनमधील संपत्ती गोठवण्याचे आदेश त्याठिकाणच्या एका न्यायालयाने दिले आहेत. माल्ल्याला खर्चाची मर्यादाही घालून दिली आहे. माल्ल्याला आता आठवड्याला 6,700 डॉलर (सुमारे 4.35 लाख रुपये)च खर्च करता येतील. लंडनच्या कोर्टाने भारतीय न्यायालयाच्या निर्णयाला दुजोरा देत हे आदेश दिले आहेत. बँकांच्या मते, माल्ल्याकडे ब्रिटनमध्ये किमान तीन मालमत्ता, कार आणि इतर मौल्यवान वस्तू आहेत. माल्याच्या प्रत्यार्पणाच्या खटल्याची सुनावणीही लंडन वेस्टमिंस्टर कोर्टात सुरू आहे. माल्ल्यावर 17 बँकांचे 9,432 कोटींचे कर्ज आहे. अटक टाळण्यासाठी २ मार्चपासून माल्ल्या देशातून फरार आहे. भारताने त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी केली आहे. 


ब्रिटनमधील माल्ल्याचा पत्ता.. 
- ब्रिटनमध्ये हेर्टफोर्डशायर, इंग्लंड हा माल्ल्याचा पत्ता आहे. 2015 मध्ये ही मालमत्ता लेडीवॉक एलएलपी नावाच्या कंपनीने सुमारे 75 कोटी रुपयांत खरेदी केली होती. याच कंपनीने याठिकाणी 13 कोटींमध्ये एक लॉजही खरेदी केला आहे. या दोन्ही प्रॉपर्टीज मध्ये माल्ल्याचाही हस्तक्षेप आहे. 
- त्याशिवाय असे समजले जाते की, माल्ल्याशी संबंधित आणखी एका कंपनीने सेंट्रल लंडनमध्ये 2005 मध्ये 55 लाख पाऊंड (सुमारे 47.85 कोटी रुपयांत) एक प्रॉपर्टी खरेदी केली होती. माल्ल्याकडे दोन यॉटही आहेत, त्या विक्रीला काढल्या आहेत. यापैकी फोर्स इंडियाची किंमत 107 कोटी रुपये आणि जीपची किंमत 2.50 कोटी रुपये आहे. 


लंडन कोर्टाने सुनावणीची तारीख ठरवली 
- वेस्टमिंस्टर कोर्टात प्रत्यार्पण खटल्याची सुनावणी सुरू आहे. कोर्टाने 4, 5, 6, 7, 11, 12, 13 आणि 14 डिसेंबरला या प्रकरणाची सुनावणी ठरवली होती. डिफेन्स टाइम टेबलनुसार 24 डिसेंबरला निर्णय सुनावला जाणार आहे. 
- न्यूज एजन्सीनुसार लेखी क्लोजिंग आर्ग्युमेंट सबमिट केल्याच्या दोन्ही पक्षाच्या बिजी शेडयुलवर जजेसने सल्ला दिला की, नव्या वर्षात ओरल क्लोजिंग सबमिशन संपवण्याऐवजी जानेवारीत अर्ध्या दिवसाची सुनावणी केली जाण्याची शक्यता आहे. 


आतापर्यंत दोन वेळा अटक झाला माल्ल्या 
- पहिल्यांदा लंडन अॅडमिनिस्ट्रेशनने माल्याला रेड कॉर्नर नोटीसच्या आधारे सर्वप्रथम 18 एप्रिलला अटक केली होती. पण त्याला तीन तासात जामीन मिळाली होती. 
- त्यानंतर दुसऱ्यांदा 3 ऑक्टोबरला मनी लॉन्ड्रिंगच्या दुसऱ्या प्रकरणात माल्ल्याला अटक करण्यात आली. यावेळी त्याला अर्ध्या तासात जामीन मिळाला होता. 
- भारताने यावर्षी माल्ल्याच्या प्रत्यार्पणाची विनंती केली होती. त्यानंतर मार्चमध्ये ब्रिटीश पंतप्रधान थेरेसा मे यांनी लंडनमध्ये अरुण जेटली यांची प्रोटोकॉल तोडून भेट घेतली होती. त्यात माल्ल्याला भारताच्या ताब्यात देण्याबाबत चर्चा झाली होती. 

 

पुढे पाहा, माल्ल्याकडे कोणत्या बँकेचे आहे किती कर्ज...

 

बातम्या आणखी आहेत...