आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदींचा 4 वर्षांत चीनचा चौथा दौरा, 11 व्या वेळी जिनपिंग यांच्याशी भेट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली  - पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी दोन दिवसांसाठी चीनला रवाना झाले. मोदींचा हा चार वर्षांतील चौथा चीन दौरा आहे. त्याचबरोबर ते चीनला सर्वात जास्त वेळा जाणारे भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. याआधी माजी पंतप्रधान मनमोहनसिंग तीनदा चीनला गेले होते.

 

शुक्रवारी मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात वुहान शहरात चर्चा होईल. तिला ‘अनौपचारिक शिखर चर्चा’ म्हटले आहे. भारत आणि चीन यांच्या नेत्यांच्या बैठकीनंतर संयुक्त पत्रपरिषद किंवा मीडिया ब्रीफिंग पहिल्यांदाच होणार नाही. तरीही उभय देशांत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते. मोदी या वर्षी जूनमध्ये पुन्हा एकदा शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीसाठी चीनला जातील. मोदी याआधी जी-२० आणि ब्रिक्स परिषदेत भाग घेण्यासाठी गेले होते. मात्र, जिनपिंग चार वर्षांत फक्त एकदाच भारतात आले आहेत.  


मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी ६७ वर्षांत फक्त पाच पंतप्रधानांनी चीनचा दौरा केला होता. त्यात जवाहरलाल नेहरू, राजीव गांधी, नरसिंह राव, अटलबिहारी वाजपेयी आणि मनमोहनसिंग यांचा समावेश आहे. 

 

चीनला वारंवार का जाताहेत? 

 

शांघाय सहकार्य संघटना 
जूनमध्ये शांघाय सहकार्य संघटनेची (एससीओ) बैठक होत आहे. भारताला दीर्घ काळापासून या संघटनेत आपले महत्त्व वाढवण्याची इच्छा आहे. त्यामुळे या नेत्यांच्या भेटीचा वेगळा अर्थ काढला जात आहे. त्यात मोदी हे जिनपिंग यांना भारताला स्थायी सदस्यत्व देण्यासाठी वकिली करण्यास सांगू शकतात.

 

डोकलाम वाद 
मोदी-जिनपिंग यांची ही अनौपचारिक शिखर चर्चा डोकलाम वादानंतर दोन्ही देशांच्या संबंधांत आलेली कटुता दूर करण्याचा प्रयत्न समजला जात आहे. या बैठकीत दोन वर्षांपासून परस्पर संबंधांत आलेली कटुता दूर करणे आणि परस्पर संबंध आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न आहे.

 

एनएसजीचे सदस्यत्व  
बैठकीसाठी अजेंडा नाही, पण डोकलामशिवाय प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शांतता, चीनचा बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह, एनएसजी सदस्यत्व, व्यापार आणि भारतात चिनी गुंतवणुकीवर चर्चा होऊ शकते. चीन २०१३ मध्ये सीमा संरक्षण सहकार्य करारावर वेगळ्या आराखड्याचा प्रस्ताव मांडू शकतो.  

 

मोदींसाठी शी जिनपिंग शिष्टाचार मोडणार, प्रथमच दुसऱ्या देशाच्या नेत्याशी थेट भेट 

भारताचे संरक्षण सल्लागार राहिलेले लेफ्टनंट जनरल एस. एल. नरसिंहन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिले असे पंतप्रधान आहेत ज्यांच्यासाठी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी शिखर बैठक निश्चित केली आहे. चीनच्या राजकारणात हा खूप मोठा अपवाद आहे.  चीनचे अध्यक्ष दुसऱ्या देशाच्या पंतप्रधानांसोबत शिखर बैठक घेतात हीच मोठी कूटनीतिक घटना आहे. मोदी-जिनपिंग यांच्यातील समन्वयामुळे हे शक्य झाले. मोदींनी गुजरातमध्ये साबरमतीच्या किनारी त्यांचे आतिथ्य केले होते. त्यानंतर जिनपिंग यांनी त्यांना आपले गृहनगर शियान येथे निमंत्रित करून त्यांचे भव्य स्वागत केले. दोन्ही नेत्यांत चांगली केमिस्ट्री असल्याचे दिसते. आतापर्यंत मोदी जेव्हा चीनच्या दौऱ्यावर आले तेव्हा त्यांची अधिकृत भेट पंतप्रधान ली केकियांग यांच्याशी होत होती. त्यानंतर ते जिनपिंग यांना भेटत असत. त्यामुळे वुहानमध्ये अनौपचारिक शिखर बैठक निश्चित करण्यात आली आहे. बीजिंगमध्ये बैठक झाली असती तर शिष्टाचार आडवा आला असता. सेंटर फॉर जॉइंट वॉरफेअर स्टडीजचे संचालक लेफ्टनंट जनरल विनोद भाटिया म्हणाले की, अमेरिकेच्या अध्यक्षांनंतर चीनने मोदींसाठी हा अपवाद केला आहे. पंतप्रधानांऐवजी अध्यक्ष त्यांच्यासोबत शिखर बैठक घेत आहेत. 

 

ले. जनरल एस. एल. नरसिंहन, माजी संरक्षण सल्लागार
ले. जनरल विनोद भाटिया, सेंटर फॉर वॉरफेअरचे संचालक  

 

पुढील स्लाईडवर वाचा, मोदींच्या चीन दौऱ्याचे काय आहे महत्व....

 

 

बातम्या आणखी आहेत...