आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनैतिक संबंधात अडसर..जन्मदात्या आईने 35 हजारांत दिली होती 22 वर्षीय मुलाच्या हत्येची सुपारी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रेटर नोएडा- दादरीमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या 22 वर्षीय अंशुलच्या हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. अवैध संबंधात अडसर ठरलेल्या अंशुलच्या हत्येची सुपारी त्याची जन्मदात्री आईनेच दिली होती, असा खळबळजनक खुलासा पोलिसांनी केला आहे. अंशुलला मारण्यासाठी 35 हजार रुपयांत सुपारी देण्यात आली होती. या कामात आरोपी आईने प्रियकर कन्हैया आणि जावई अमितच्या मदतीने अशुंलची हत्या घडवून आणल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

 

पोलिसांनी शुक्रवारी अंशुलची आई, अमित, कन्हैया, सत्येंद्र आणि सचिनला अटक केली. अंशुलला मारण्यासाठी आरोपी आईने सत्येंद्र आणि सचिनला 35 हजार रुपयांत सुपारी दिली होती. दोघांनी अशुंलची गळा आवळून हत्या केली.

 

सीओ निशांक शर्मा यांनी सांगितले की, 18 जून रोजी दादरीमधील लुहारली गावाजवळ अंशुलचा मृतदेह सापडला होता.अमितच अंशुलला घेऊन याठिकाणी आला होता. कोल्ड्रिंक आणण्याच्या बहाण्याने अंशुलला तिथेच सोडून अमित रफुचक्कर झाला होता.

 

अमितने असा काढला बदला..

सीओ शर्मा यांनी सांगितले की, अंशुलने एकदा दारुच्या नशेत अमितला बेदम मारले होते. याचा बदला घेण्यासाठी अमितने सासूला अंशुलच्या हत्येत मदत केली होती.

 

 

बातम्या आणखी आहेत...