आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकेकाळी घनिष्ठ मित्र होते मोदी अन् तोगडिया, अशी आली संबंधांत कटुता...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रवीण तोगडिया सोमवारी अचानक बेपत्ता झाल्याने देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींशी 15 वर्षांपासून त्यांच्या तणावपूर्ण संबंधांवर चर्चा सुरू झाली आहे. सूत्रांनुसार, एक काळ असाही होता जेव्हा पंतप्रधान मोदी आणि तोगडिया घनिष्ठ मित्र होते. दोघेही एकाच स्कूटरवर बसून आरएसएस कार्यकर्त्यांना भेटायला जात होते. तथापि, 2002 मध्ये मोदी गुजरातचे मुख्यमंत्री बनताच दोघांच्या संबंधात कटुता आली. 

 

> विहिंपच्या काही नेत्यांच्या मते, तोगड़िया यांच्याविरुद्ध मागच्या महिन्यात घटनाक्रम वेगाने बदलत गेला, जो राजकारणाने प्रेरित आणि त्यांचा 'अपमान' करण्याचा कट होता. सूत्रांनुसार, आरएसएस आणि भाजप दोन्हींनाही वाटते की, विश्व हिंदू परिषदेने तोगडियांना मुक्त करावे, जेणे करून त्यांना संघाच्या बॅनरखाली नवनवे कार्यक्रम राबवता येतील. तोगड़ियांनी यांचा जोरदार विरोध केला, परिणामी त्यांच्याविरुद्ध जुन्या केसेसमध्ये कारवाईने वेग घेतला.

गुजरातचे एक ज्येष्ठ विहिंप नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर एका माध्यमाला सांगितले की, 'नुकतीच भुवनेश्वरमध्ये विहिंपची कार्यकारी बोर्डाची बैठक झाली होती. तोगड़िया यांचा आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षाचा कार्यकाळ 31 डिसेंबर 2017 रोजी संपला होता आणि त्यासोबतच अध्यक्ष राघव रेड्डी यांचाही कार्यकाळ संपत होता. आरएसएसला रेड्डी यांच्या जागी व्ही. कोकजे यांना अध्यक्ष बनवायचे होते. परंतु, तोगड़ियांनी याचा जोरदार विरोध केला आणि रेड्डींना पदावर ठेवण्यासाठी जोर दिला.' 


गोरक्षेवर तोगड़ियांनी केली होती काँग्रेसची प्रशंसा..
> ते म्हणाले की, 'नंतर तोगड़ियांनी एका विशाल सभेला संबोधित केले आणि म्हटले की, काही नेत्यांना मला हटवायचे आहे. तोगड़ियांनी राम मंदिर आणि गोरक्षेबद्दल केंद्र सरकारवर हल्लाबोल केला होता. एवढेच नाही, त्यांनी गोसेवेसाठी काँग्रेसचे कौतुकही केले.' विहिंप नेते म्हणाले की, 'गत 15 दिवसांत तोगड़ियांचे नाव 2 प्रकरणांत समोर आले आहे. यात एक गुजरात आणि दुसरे राजस्थानचे आहे. गुजरातच्या 22 वर्षे जुन्या प्रकरणात तोगड़िया आपल्या समर्थकांसह कोर्टात गेले होते. तथापि, त्यांना शोधण्यासाठी गेलेल्या राजस्थान पोलिसांना रिकाम्या हाताने परतावे लागले. ज्या प्रकारे या घटना तोगड़िया यांच्या विरुद्ध घडत आहेत, त्यावरून वाटते की, भाजप तोगड़िया यांना सोडणार नाही.'  

 

मोदींनी कामकाजात हस्तक्षेपावर लावली होती रोख... 
दरम्यान, 2002 मध्ये गुजरातचे तत्कालीन सीएम मोदींनी स्पष्ट केले होते की, तोगड़िया सरकारच्या कामकाजात विशेषकरून गृह विभागाच्या प्रकरणांत हस्तक्षेप करणार नाहीत. असे मानले जाते की, येथूनच दोघांच्या संबंधात कटुतेला सुरुवात झाली होती. मोदींद्वारे बाजूला फेकले गेल्याने तोगडियांना फसवणूक झाल्याची जाणीव झाली.

> हा वाद तेव्हा आणखी वाढला जेव्हा मोदी सरकारने गांधीनगरमध्ये 200 मंदिरे पाडली आणि मोहम्मद अली जिन्नावर लालकृष्ण अडवाणी यांच्या जबाबानंतर आंदोलन करणाऱ्या विहिंप कार्यकर्त्यांना पोलिसांना बेदम मारहाण केली. तोगडिया यांनी मोदींच्या 2011 मध्ये मुसलमानांसाठीच्या 'सद्भावना' संदेशाची खिल्ली उडवली आणि म्हटले की, "त्यांनी प्रतिमा बदलासाठी हिंदुत्वाचा अजेंडा त्यागला आहे."


काय आहे राजस्थानचे प्रकरण? 
राजस्थानच्या गंगापूर कोर्टाने 10 वर्षे जुन्या दंगलीच्या एका प्रकरणात तोगड़िया यांच्याविरुद्ध अटक वॉरंट बजावले होते. अनेक वेळा जामीनपात्र वॉरंट असूनही ते कोर्टात हजर झाले नाही, तेव्हा कोर्टाने त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले. हे वॉरंट बजावण्यासाठीच राजस्थान पोलिस सोमवारी अहमदाबाद गेले होते, परंतु तोगडिया न आढळल्याने त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले.


पुढच्या स्लाइड्सवर वाचा, तोगडियांनी लिहिलेले पुस्तक, पीएम मोदींसाठी कसे ठरू शकते त्रासदायक?

बातम्या आणखी आहेत...