आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

25 मुख्यमंत्री करोडपती, जाणून घ्या आपल्या सीएमकडे किती आहे संपत्ती!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली -  देशातील 81 टक्के मुख्यमंत्री करोडपती आहेत. 177 कोटींच्या संपत्तीसोबत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू सर्वाधिक श्रीमंत आहेत. त्रिपुराचे माणिक सरकार यांची संपत्ती सर्वात कमी 26 लाख रुपये आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे 4 कोटींच्या संपत्तीसोबत 17व्या स्थानावर आहेत.

- राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांतील 31 मुख्यमंत्र्यांच्या निवडणूक शपथपत्राच्या आधारे असो. फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स अँड नेशनल इलेक्शन वॉचने ही रिपोर्ट जारी केली आहे.
- रिपोर्टनुसार, 25 मुख्यमंत्री करोड़पती आहेत. दोन जणांची संपत्ती 100 कोटींहून जास्त आहे. सर्व 31 मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीची सरासरी 16.18 कोटी रुपये आहे.

 

31 सीएमपैकी 35% विरुदध गुन्हेगारी खटले
- रिपोर्टनुसार, देशातील 35% मुख्यमंत्र्यांविरुद्ध गुन्हेगारी प्रकरणे दाखल आहेत. 31 पैकी 11 मुख्यमंत्र्यांनी आपल्याविरुद्ध अशी प्रकरणे दाखल असल्याचे घोषित केले आहे. 26% मुख्यमंत्र्यांविरुद्ध तर मर्डर, मर्डरचा प्रयत्न, फसवणूक यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

 

योगींची संपत्ती 95 लाख, केजरीवाल यांची 2 कोटी रुपये

विजय रूपाणी, गुजरात 9.09 कोटी
शिवराज सिंह, मध्यप्रदेश 6.27 कोटी
रमनसिंह, छत्तीसगड 5.61 कोटी
देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र 4.34 कोटी
जयराम ठाकूर, हिमाचल 3.27 कोटी
नीतीश कुमार, बिहार 1.71 कोटी
मनोहर खट्‌टर, हरियाणा 0.61 कोटी
रघुवर दास, झारखंड 0.72 कोटी

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, इतर देशातील मुख्यमंत्र्यांची संपत्ती

बातम्या आणखी आहेत...