आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमृतसर- संपूर्ण देश दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली देत असताना पंजाबचे मंत्री आणि माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू त्यांना श्रद्धांजली न देताच पाकिस्तानात निघून गेले. सिद्धू यांच्या अशा वागण्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.
शहीद मदनलाल ढिंगरा यांच्या 'बलिदान दिनानिमित्त शुक्रवारी टाऊन हॉल येथे माजी आरोग्यमंत्री लक्ष्मीकांता चावला यांनी श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमस्थळी अटलजींचीही प्रतिमा ठेवण्यात आली होती. सिद्धू यांनी शहीद मदनलाल ढिंगरा यांना श्रद्धांजली अर्पण केली मात्र या कार्यक्रमस्थळी अवघ्या आठ फूट अंतरावर असलेल्या अटलजींच्या प्रतिमेला सिद्धू यांनी फूल अर्पण केले नाही.
सिद्धू सकाळी 9 वाजता टाऊन हॉल पोहोचले होते. त्यांनी शहीद ढिंगरा यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण केले. नंतर सिद्धू यांनी यावेळी चावला यांचाही आर्शीवाद घेतला. परंतु अवघ्या 8 फूट अंतरावर ठेवलेल्या अटलजींच्या प्रतिमेला पुष्प न अर्पण करताच सिद्धू निघून गेले. दरम्यान, फेब्रुवारी 2007 मध्ये अमृतसर लोकसभा मतदार संघात झालेल्या पोटनिवडणुकीत सिद्धू यांच्या प्रचारासाठी वाजपेयी आले होते.
नवज्योतसिंग सिद्धू हे पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी गेले आहेत. हॉटेलमध्ये पत्रकारांशी संवाद साधतांना त्यांनी इम्रान खान यांची भरभरून प्रशंसा केली. पश्मीना शॉल त्यांना गिफ्ट करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शुक्रवारी दुपारी 3 वाजता अटारी-वाघा बॉर्डर ओलांडल्यानंतर सिद्धू यांनी इम्रान यांच्यावर शायरीही केली.
- माजी उपसभापती बीर दविंदर यांनी सिद्धू यांच्यावर कडाडून टीकाकेली आहे. अटलजी यांच्या निधनाने संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. दुसरीकडे राष्ट्रीय दु:खात सिद्धू यांना सेलिब्रेशन करणे शोभले नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.