आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यूनंतरही जगता येईल असा आहे शोध; मेंदू वापरेल इंटरनेट अन् तुम्ही जगाल डिजिटली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - जगभरात नवनवीन स्टार्टअप सुरू होताहेत. सिलिकॉन व्हॅलीमधील एका स्टार्टअपने दावा केला आहे की, तुमच्या मृत्यूनंतरही तुमचा मेंदू इंटरनेट वापरू शकेल. यासाठी मेंदूतील स्मृती ते कॉम्प्युटरवर अपलोड करतील. याचाच अर्थ मृत्यूनंतर तुम्ही डिजिटली जिवंत राहू शकाल असा दावा करण्यात येत आहे.  

> अमेरिकेतील दोन इंजिनिअर्सनी नेटकम नावाने एक नवीन स्टार्टअप सुरू केले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, ते मेंदूची अर्काइव्हिंग करतात. सोप्या शब्दांत सांगायचे तर ते तुमच्या मेंदूतील स्मृती काढून त्या इंटरनेटवर क्लाऊडमध्ये अपलोड करतात. याचा फायदा म्हणजे येणाऱ्या काळात शास्त्रज्ञ एखाद्या व्यक्तीचा डिजिटल व्हर्जन बनवू शकतील.  

> परंतु यात एक समस्या आहे. जर तुम्ही आयुष्यभर इंटरनेटवर राहण्यासाठी मृत्यूही पत्करला, तरीही तुमच्या आठवणी कॉम्प्युटरवर सेव्ह करण्याची टेक्नॉलॉजी अजून आलेली नाही. तथपि, या स्टार्टअपने दावा केला आहे की, असे तंत्रज्ञान लवकरच अस्तित्वा येईल. यात ते एक केमिकल मेंदूमध्ये इंजेक्ट करतील आणि मेंदूसोबतच मेंदूतील आठवणीही प्रिझर्व्ह करतील.

> जर तुम्हालाही वाटत असेल की, इंजेक्शन लावून डिजिटल आयुष्य मृत्यूनंतरही जगता येईल, तर तुमचं चुकतंय. कारण मेंदूला याप्रकारे प्रिझर्व्ह करण्यासाठी तुमचा मेंदू जिवंत असतानाचा प्रिझर्व्ह करावा लागेल. याचा अर्थ असा की, तुम्ही जिवंत असतानाच हे इंजेक्शन दिले जाईल. आणि यामुळे तुमचा मेंदू प्रिझर्व्ह होईल. म्हणजेच तुमचा मृत्यू होईल. यानंतरही तुमच्या आठवणी योग्य रीतीने अपलोड होतील की नाही, याची काहीही गॅरंटी सध्या तरी नाही.

> आणि हो, या प्रकारे मृत्यू हा स्वस्त नाहिये. तुम्हाला तब्बल 10,000 डॉलर (6 ते 7 लाख रुपये) जमा करावे लागतील. जर शेवटच्या क्षणी तुम्ही तुमचा विचार बदलला आणि माघार घेतली तर तुमचे पैसे परत होतील. या योजनेत आतापर्यंत 25 जणांनी अर्ज केलेला आहे. यासोबतच ब्रेन प्रिझर्व्हेशन फाउंडेशनने या स्टार्टअपला 80,000 डॉलरचे बक्षीसही दिले आहे.  

 

पुढच्या स्लाइड्सवर इन्फोग्राफिक्समधून जाणून घ्या, या भन्नाट स्टार्टअपविषयी...