आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली - दिल्लीच्या जैतपूर परिसरात राहणाऱ्या सावत्र बापाने आपल्या 14 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीड़ितेच्या मते, ती जेव्हा विरोध करायची, तेव्हा आरोपी तिला प्रचंड मारहाण करायचा. पीड़ितेला उपचारांसाठी नेण्यात आले, तेव्हा बलात्काराचा खुलासा झाला. पोलिसांनी आरोपी सावत्र बापाच्या मुसक्या आवळल्या आहेत.
'तीन वर्षे केला बलात्कार'
पीडितेच्या मते, आरोपी 3 वर्षांपासून बलात्कार करत आहे. मुलगी जेव्हाही त्याला विरोध करायची, तेव्हा तो तिला प्रचंड मारहाण करायचा. एवढेच काय, जिवे मारण्याचीही धमकी द्यायचा. पीडिता म्हणाली, आईला यातील काहीही माहिती नव्हते.
कसा झाला खुलासा?
पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, 'मुलगी खूप अशक्त आणि आजारी होती. यामुळे तिची आई तिला उपचारांसाठी सरकारी दवाखान्यात घेऊन गेली. परंतु डॉक्टरांनी मुलीची तपासणी केल्यावर बलात्काराचा उलगडा झाला. यानंतर दवाखान्याने दिल्लीच्या चाइल्ड प्रोटेक्शन युनिटला माहिती कळवली. यानंतर चाइल्ड हेल्पलाइनचे लोक पीडितेसोबत पोलिस स्टेशनला पोहोचले, तेथे तक्रार नोंदवण्यात आली.
-डीसीपी (साऊथ-ईस्ट) चिन्मोय बिस्वाल म्हणाले की, '20 एप्रिल रोजी बटरफ्लाय चाइल्ड हेल्पलाइनमधून तक्रार मिळाली होती. यात मुलीवर झालेल्या बलात्काराबाबत सांगण्यात आले होते. यानंतर पोलिसांनी अॅक्शन घेत आरोपीला अटक केली आहे.
मेडिकल टेस्टमध्ये झाला बलात्काराचा खुलासा
तक्रार मिळाल्यानंतर पीडितेचे मेडिकल चेकअप करण्यात आले, यात बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले. मग पोलिसांनी आरोपीला अटक केली. आरोपी सावत्र बाप पेंटरचे काम करतो.
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, इन्फोग्राफिक्समधून प्रकरण...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.