आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मौनसाहब! किसके अच्छे दिन के लिए बनाई सरकार', राहुल गांधींचा प्रश्नांचा भडीमार सुरुच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - गुजरात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी 22 सालों का हिसाब, गुजरात मांगे जवाब नावाच्या मालिकेतून राहुल गांधी रोज एक प्रश्न विचारत आहेत. सोमवारी त्यांनी या मालिकेतील 13 वा प्रश्न विचारला. यात त्यांनी केंद्र सरकारवर लोकपालचे महत्त्व संपुष्टात आणणे, तथाकथित घोटाळे आणि मोजक्या व्यावसायिकाना फायदा पोहोचवल्याचा आरोप केला. राहुल यांनी विचारले की, 'मौनसाहब' च्या उत्तराची वाट पाहतोय. कोणाच्या अच्छे दिनसाठी सरकार स्थापन केले. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान 14 डिसेंबरला पूर्ण होत आहे. निकाल 18 तारखेला लागणार आहे. 


भाजपसाठी आता भाषण ही शासन.. 
- राहुल गांधींनी शनिवारी ट्वीटमध्ये लिहिले, गुजरातमध्ये 22 वर्षांपासून भाजपचे सरकार आहे. मला फक्त एवढे विचारचे आहे की, यावेळी मोदींच्या भाषणातून 'विकास' का गायब झाला आहे. 
- मी गुजरातच् रिपोर्ट कार्ड म्हणत 10 प्रश्न विचारले. त्यांचे उत्तरही मिळाले नाही. पहिल्या टप्प्यातील प्रचार संपेपर्यंतही जाहीरनामा नाही. म्हणजे आता ‘भाषण ही शासन’ आहे का? 


ट्विटरवर प्रश्नांची मालिका.. 
राहुल गांधी ट्विटरवर 22 वर्षांचा हिशेब मागत एक मालिका चालवत आहेत. त्यावर रोज मोदींना एक प्रश्न विचारत आहेत. गुजरात के हालात पर ‘प्रधानमंत्री जी से सवाल’ लिहून ते प्रश्न ट्विट करतात.

 

पुढे वाचा, राहुल गांधींनी यापूर्वी विचारलेले 12 प्रश्न...

बातम्या आणखी आहेत...