आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पेट्रोलियम उद्योग 32 टक्के वाढल्याने रिलायन्सला 9435 कोटी विक्रमी नफा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानीच्या नेतृत्वातील कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजला जानेवारी - मार्च २०१८ मध्ये ९,४३५ कोटी रुपयांचा संकलित नफा झाला आहे. मार्च २०१७ च्या तिमाहीमध्ये झालेल्या ८,०४६ कोटी रुपयांच्या तुलनेत हा १७.३ टक्के जास्त आहे. नफ्याची ही रक्कम रिलायन्सच नाही, तर भारतातील कोणत्याही कंपनीच्या दृष्टीनेही विक्रमी आहे. कंपनीचा महसूल ३९ टक्क्यांनी वाढून १,२९,१२० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. पूर्ण वर्षात कंपनीला ४,३०,७३१ कोटींच्या महसुलावर ३६,०७५ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने प्रति शेअर ६ रुपये लाभांश देण्याचाही निर्णय घेतला आहे. 

 
स्टँडअलोन आधारावर महसूल ९,८९४ कोटी आणि नफा ८,६९७ कोटी राहिला आहे. यात अनुक्रमे २१.८ टक्के आणि ६.७ टक्क्यांची वाढ झाली आहे. स्टँडअलोन नफ्यात सलग १३ व्या तिमाहीत वाढ झाली. रिफाइनिंग, मार्केटिंग, तेल व वायूसह एकूण पेट्रोलियम बिझनेसच्या महसुलात ३२% वाढ झाली. पूर्ण महसुलात ३९% वाढीमागे अनेक कारणे आहेत.

 

नगदीत १% वाढ  
* रिलायन्सवर २,१८,७६३ कोटींचे कर्ज आहे. मार्च २०१७ च्या १,९६,६०१ कोटींच्या तुलनेत यात ११% वाढ झाली आहे.  
* कंपनीकडे ७८,०६३ कोटी रुपये नगदी आहेत. मार्च २०१७ मध्ये ७७,२२६ कोटी नगदी होते. यात केवळ १% वाढ झाली. 

जिओच्या महसुलात घट  
जानेवारी ते मार्च तिमाहीमध्ये रिलायन्स जिओला ५१० कोटी आणि पूर्ण वर्षात ७२३ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. डिसेंबर तिमाहीमध्ये ५०४ कोटींचा नफा झाला होता. तिमाही महसूल ७,१२८ तर वार्षिक २०,१५८ कोटी रुपये राहिला. प्रती युजर सरासरी महसूल डिसेंबर तिमाहीच्या १५४ रुपयांच्या तुलनेत कमी होऊन १३७.१ रुपये राहिला आहे. 

 

मारुतीचा नफा १० % वाढून १८८२ कोटी

नवी दिल्ली | देशातील सर्वात मोठी कारनिर्मिती कंपनी मारुती सुझुकीच्या आर्थिक वर्ष २०१७-१८ च्या अखेरच्या तिमाहीतील नफा १० टक्क्यांनी वाढला आहे. जानेवारी ते मार्च तिमाहीमध्ये कंपनीला १,८८२.१ कोटी रुपयांचा नफा झाला असून या मागील वर्षी समान कालावधीमध्ये कंपनीला १,७१०.५ कोटी रुपयांचा नफा झाला होता. मारुतीच्या नफ्यात सलग १५ व्या तिमाहीमध्ये वाढ नोंदवण्यात आली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने ३१ मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी पाच रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरवर ८० रुपये लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे. मार्च तिमाहीमध्ये कंपनीची एकूण विक्री १४.४ टक्क्यांनी वाढून २०,५९४.३ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. मागील वर्षी समान तिमाहीमध्ये कंपनीला २०,४२३ कोटी रुपयांचा नफा झाला होता.

बातम्या आणखी आहेत...