आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शौर्यचक्राने सम्मानित नौसेनेच्या कॅप्टनने घराच्या छतावर हेलिकॉप्टर उतरवून 26 जणांना दिला जीवदान!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- केरळमध्ये मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे हाहाकार उडाला आहे. राज्यातील 12 जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्‍कर, नौदल, एअरफोर्स आणि एनडीआरएफचे जवान दिवसरात्र परिश्रम घेत आहेत. नौदलाचे कॅप्टन आणि शौर्यचक्र विजेता पी. राजकुमार यांनी शुक्रवारी एका घराच्या छतावर सी किंग 42 बी हेलिकॉप्टर उतरवून 26 नागरिकांना जीवदान दिले.

 

नौदलाने सांगितले की, नोव्हेंबर-डिसेंबर 2017 मध्ये भारताच्या दक्षिण किनारपट्टीवर ओचकी चक्रीवादळ आले होते. यादराम्यान कॅप्टर राजकुमार यांनी आपल्या टीमच्या मदतीने समुद्रात अडकलेल्या 218 जणांना सुखरुप बाहेर काढले होते. विशेष म्हणजे रात्रीच्या काळोखात हे ऑपरेशन यशस्वी केले होते. या कर्तुत्त्वामुळे राजकुमार यांनी शौर्य चक्र देऊन सन्मानित करण्‍यात आले होते. नौदलाच्या प्रवक्त्याने राजकुमार यांच्या धाडसी प्रयत्नाचा एक व्हिडिओ री-ट्वीट केला आहे.

दरम्यान,  केरळमध्ये शतकातील सर्वात प्रलयकारी महापूर आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळमधील पूर प्रभावित भागात हवाई दौरा केला. गुरुवार आणि शुक्रवारी झालेले भूस्खलन आणि आलेल्या पुरात 180 जणांचा बळी गेला आहे. केरळमध्ये  8 ऑगस्टपासून 178 तर पावसाळ्यातील एकूण बळींचा अकडा 385 वर गेला आहे. राज्यातील 12 जिल्ह्यात 3.14 लाख लोक बेघर झाले आहेत. त्यांना 1568 मदत छावण्यांमध्ये ठेवण्यात आले आहे. 8 हजार कोटींपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. दुसरीकडे, एनडीआरएफचे मदत व बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे.

 

बातम्या आणखी आहेत...