आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Special Story About How Terrorist Enter In Kashmir And How They Trained By Pakistan

जाणून घ्या: काश्मिरात कसे घुसतात दहशतवादी; कशी दिली जाते अात्मघातकी ट्रेनिंग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेशल डेस्क- भयंकर विस्फोटाने बसणाऱ्या कानठळ्या, काळजाचा थरकाप उडवणाऱ्या किंकाळ्या, आक्रोश अन् आकांताचा भेसूर आवाज या सर्वांसोबत जम्मू-काश्मीरचे नैसर्गिक सौंदर्याने नटलेले खोरे अन् तिथली माणसं अपरिहार्य जीवन जगत आहेत. जेव्हा एखादा आत्मघातकी दहशतवादी या स्वर्गात प्रवेश करतो तेव्हा हे नंदनवन भयकंपाने हादरून जाते. काश्मीरला लागलेले दहशतीचे हे ग्रहण अनेक वर्षांपासून सुटलेले नाही. पाकमधून एखादा अजमल आमिर कसाब येऊन निष्पाप माणसांवर अमानूष गोळीबार करतो, तर कधी एखादा नावेद आपल्या रायफलीतून भारताच्या आर्मीवर हल्ला चढवतो. पण हे कसाब, नावेद यासारखे तरुण पाकला मिळतात कुठून, ते भारतात शिरतात तरी कसे, त्यांना आयुष्याची पर्वा न करण्याची आत्मघातकी ट्रेनिंग दिली तरी कशी जाते? सामान्य भारतीयाला पडणाऱ्या या सर्व प्रश्नांची उकल या निमित्ताने DivyaMarathi.Com करत आहे.

 

ताजा दहशतवादी हल्ला
> जम्मू-काश्मीरमध्ये तीन दिवसात दुसरा दहशतवादी हल्ला झाला आहे. विशेष म्हणजे दोन्ही वेळा दहशतवाद्यांनी लष्करी छावणीला लक्ष्य केले आहे. सोमवारी श्रीनगरमधील करणनगर येथील सीआरपीएफ कॅम्पवर हल्ला करण्यात आला. गोळीबारात एक जवान शहीद झाला आहे. दहशतवादी AK-47 रायफलसह छावणीत घुसले. फोर्सने त्यांच्यावर गोळीबार करत त्यांना पिटाळले. दहशतवाद्यांनी सध्या एका रिकाम्या इमारतीचा आसरा घेतला असून त्यामधून गोळीबार सुरू आहे.

 

पाकची पोलखोल

> सन 2015 मध्ये उधमपूर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जिवंत पकडलेला दहशतवादी नावेदने पाक पुरस्कृत दहशतवादाची पोलखोल केली होती. सुरक्षा दलाने केलेल्या चौकशीत नावेद पाकचे मनसुबे आणि दहशतवादाचे मूळ याबाबत खुलासे करून पाकिस्तानात कशाप्रकारे एखादा आत्मघातकी हल्लेखोर घडवला जात आहे हे स्पष्ट केले.
> काश्मीर मुद्द्यावर पाकने नेहमी दुतोंडी भूमिका अंगीकारलेली आहे. भारतासोबत चर्चेचे नाटक सुरू ठेवायचे आणि इकडे राजरोस फियादीन (आत्मघातकी) घडवायचे, असा दुटप्पीपणा उभ्या जगाने पाहिलेला आहे.
> उधमपूरमध्ये जिवंत पकडलेला अतिरेकी नावेदने पाकिस्तानचा बुरखा फाडला असून तिथे दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिल्या जात असलेल्या ठिकाणांची माहिती दिली. ज्यांच्या इशाऱ्यावरून भारतात दहशतवादी कृत्ये घडवली जातात त्या आपल्या मालकांची नावेही नावेदने घेतली. तो भारतात कसा आला, कुणाच्या इशाऱ्यावरून आला, त्याला ट्रेनिंग कोणी दिली आणि त्याने दहशतवादी हल्ल्याचा कट कसा तडीस नेला याची सर्व माहिती सुरक्षा दलांकडे कबूल केली आहे. यावरून पाकिस्तान कशाप्रकारे दहशतवादाचे भरणपोषण करतोय हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.  

> सूत्रांनुसार, दहशतवादी नावेद म्हणाला की, त्याने पाकिस्तानच्या मुजफ्फराबादच्या जंगलांत एके 47 सारखी खतरनाक शस्त्रास्त्रे चालवण्याची ट्रेनिंग घेतली. त्याने सांगितले की, त्याला मुजफ्फराबादच्या गढ़ी हबीबुल्लाहच्या ट्रेनिंग कँपमध्ये दहशतवाद हल्ल्यांसाठी 21 दिवसांची ट्रेनिंग मिळाली होती. याशिवाय मुझफ्फराबादला लागून पाकच्या खैबर पख्तुन्ख्वाच्या मनशेहरा परिसरातही नावेदने 21 दिवस ट्रेनिंग घेतलेली आहे.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, कशाप्रकारे प्रशिक्षित केले जातात दहशतवादी? कशी घेतात भारतात एंट्री?

बातम्या आणखी आहेत...