आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • बाप ऑफिसला गेल्यावर सावत्र आई दाखवायची खरे रूप The Stepmother Used To Tell The Daughter To Watch The Filthy Movie

चिमुरडी म्हणाली- पप्पा घरी नसल्यावर सावत्र आई अन् मामा अश्लील व्हिडिओ दाखवून करतात असे काही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दिल्लीच्या नॉर्थ अव्हेन्यू पोलिस स्टेशनमध्ये चकित करणारे प्रकरण समोर आले आहे. केंद्र सरकारच्या हॉस्पिटलमध्ये नियुक्त एका वरिष्ठ डॉक्टरच्या मुलीने सावत्र आई आणि मामावर गंभीर आरोप केले आहेत. ती म्हणाली की, आई मला मामासोबत बळजबरी अश्लील चित्रपट पाहण्यासाठी सांगते. न पाहिल्यास आई आणि मामा दोघेही बेदम मारहाण करायचे. मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी पॉक्सो अॅक्टनुसार आणि छेडछाडीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी सावत्र आईची चौकशी सुरू केली आहे. तर मामा फरार झाला आहे. त्याच्या अटकेसाठी पोलिस छापेमारी करत आहेत.  

 

जुलूम... बाप ऑफिसला जाताच सावत्र आई दाखवायचे खरे रूप
पोलिसांनी सांगितल्यानुसार, केंद्र सरकारच्या हॉस्पिटलमध्ये कार्यरत वरिष्ठ डॉक्टरचे कुटुंब नॉर्थ अॅव्हेन्यूमध्ये राहते. त्यांच्या कुटुंबात पत्नी आणि मुलगी आहे. डॉक्टरांचे दुसरे लग्न आहे. दुसरी पत्नीही डॉक्टर आहे. मुलगी पहिल्या पत्नीपासून झाली आहे. मुलगी एका मोठ्या खासगी शाळेत शिकते. तिने पोलिसांना सांगितले की, ती 2015 पासून सावत्र आईसोबत राहत आहे. ती तिला पसंत करत नाही. वडील जेव्हाही ऑफिसला निघून जायचे आणि ती शाळेतून यायची तेव्हा आई ना जेवण द्यायची, ना शाळेचा अभ्यास करू द्यायची. 

 

भीती... सावत्र मामा वडिलांचे बरेबाईट करण्याची धमकी द्यायचा
चिमुकली म्हणाली, घरात नेहमी तिचा 30 वर्षीय सावत्र मामा येत-जात होता. त्याच्यासोबत अश्लील चित्रपट पाहण्यासाठी तिची सावत्र आई मजबूर करायची. असे न केल्यास ते दोघे तिला बेदम मारहाण करायचे. दोघेही मुलीला धमकी द्यायचे की, जर तिने शाळेत वा आपल्या बापाला याबाबत काहीही सांगितले तर ते त्यांचे बरेबाईट करतील. यामुळे मुलगी मागच्या काही वर्षांपासून दोघांची मारहाण सहन करत राहिली. तिचा सावत्र आईकडून सातत्याने छळ सुरू होता.

 

एवढे मारले की, हातापायांवर आली सूज
पोलिस अधिकारी म्हणाले की, एका दिवशी दोघांनी मुलीला एवढी मारहाण केली की, तिचे हातपाय सुजले आणि रक्त वाहू लागले. संध्याकाळी उशिरा जेव्हा तिचे वडील घरी परतले तेव्हा तिला घेऊन आरएमएल रुग्णालयात गेले. येथे डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केले. वडिलांनी पीडितेला दुखापतीचे कारण विचारल्यावर तिने रडतच सर्व आपबीती सांगितली. यानंतर या घटनेची सूचना पोलिसांना देण्यात आली.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या प्रकरणाचे इन्फोग्राफिक्स...

बातम्या आणखी आहेत...