आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॅमिनेटेड आणि प्लास्टिकचे आधार कार्ड गरजेचे नाही, डाटा लीकचाही धोका : UIDAI चा इशारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने आधार कार्डबाबल लोकांना इशारा दिला आहे. UIDAI सीईओ अजय भूषण पांडे म्हणाले की, आधार कार्ड प्लास्टीकचे किंवा लॅमिनेटेड असणे गरजेचे नाही. लोकांनी साध्या कागदावर आधार कार्ड डाऊनलोड करावे किंवा mAadhaar चा वापर करावा, असेही ते म्हणाले. हे सर्व ठिकाणी वैध असल्याचेही पांडे म्हणाले. स्मार्ट किंवा प्लास्टिक आधार कार्ड ही संकल्पनाच नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  UIDAI ने म्हटले की, प्लास्टीक आधार कार्डच्या वापराने डाटा लीक होण्याची शक्यताही असते. 


पुढील स्लाइड्सवर वाचा, याबाबतची काही महत्त्वाची माहिती...

बातम्या आणखी आहेत...