आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • CBI परीक्षेत फेल झालेल्यांनी 'स्पेशल 26' स्टाइलमध्ये 24 जणांना गंडवले, चौघांना अटक Inspired By Special 26 Four Men Pose As CBI Officials Arrested In Ghaziabad

CBI परीक्षेत फेल झालेल्यांनी 'स्पेशल-26' स्टाइलमध्ये 24 जणांना गंडवले, चौघांना अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - हिंदी चित्रपट 'स्पेशल 26' स्टाइलमध्ये लोकांना भयभीत करून लुबाडल्याप्रकरणी पोलिसांनी एका टोळीला अटक केली आहे. 4 जणांचा समावेश असलेल्या या टोळीवर गाजियाबाद येथे कारवाई करण्यात आली. एकेकाळी या टोळीचा म्होरक्या सीबीआय अधिकारी होण्याची स्वप्ने पाहत होता. परंतु, यासाठी दिल्या जाणारी परीक्षा तो पास करू शकला नाही. यानंतर त्याने आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन बनावट सीबीआय अधिकाऱ्यांची एक टोळी तयार केली. तसेच 24 जणांना धाक दाखवून लुटले. त्याने आपल्याला ही आयडिया चित्रपट पाहूनच मिळाली असे मान्य केले आहे. 


असे टाकायचे घर, दुकानांवर धाड
गाजियाबादचे विशेष पोलिस अधीक्षक वैभव कृष्णा यांनी शनिवारी दिलेल्या माहितीप्रमाणे, हे लोक गेल्या दोन महिन्यांपासून सीबीआय अधिकाऱ्यांचा सोंग धरून लोकांची घरे, दुकाने आणि कार्यालयांवर धाडी टाकत होते. अगदी सीबीआय अधिकारी दिसण्यासाठी त्यांनी बनावट आयडी तयार केले होते. तसेच प्रत्येक कारवाईसाठी ते खाकी पॅन्ट आणि पांढरा शर्ट असे युनिफॉर्म सुद्धा घालत होते. त्यांची धाड टाकण्याची आणि बोलण्याची शैली अशी होती की कुणालाही त्यांच्यावर संशय आला नाही. धाड टाकण्यासाठी जाताना ते आलीशान गाडी भाड्यावर घेऊन जात होते. त्या सर्वांना इंदापुरम येथील हॉटेलातून अटक करण्यात आली आहे. 


आयडी कार्ड, कागदपत्रेही जप्त
पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, त्यांच्याकडे बनावट सीबीआय लेटरहेड्स आणि आयडी कार्ड सुद्धा सापडले आहेत. याचा वापर ते धाडी टाकण्यासाठी करत होते. अटक करण्यात आलेले चारही युवक बेरोजगार होते. ते चौघे गाजियाबाद जिल्ह्यातील लोणी येथे अशीच एक सुनियोजित धाड टाकण्यासाठी जात होते. त्याचवेळी पोलिसांनी त्यांना अटक केली. विशाल दुबे असे टोळीच्या म्होरक्याचे नाव आहे. त्यातील विवेक विशालचा चुलत भाऊ आहे. तर इतर दोन आरोपी राहुल आणि संदीप त्याचे मित्र होते. 


चित्रपटात काय?
स्पेशल 26 या चित्रपटात अक्षय कुमारने एका बनावट सीबीआय अधिकाऱ्याची मुख्य भूमिका साकारली होती. 2013 मध्ये रिलीझ झालेल्या या चित्रपटात अक्षय सीबीआय परीक्षेत नापास होतो. यानंतर एक टोळी तयार करून सीबीआयची टीम म्हणून अनेकांना लुटतो. प्रत्यक्षात हा चित्रपट मुंबईत 1987 मध्ये झालेल्या ऑपेरा हाउसच्या सत्यघटनेवर आधारित आहे. त्यावेळी एका ज्वेलर्सकडे बनावट सीबीआय अधिकाऱ्यांनी धाड टाकून लाखो लुटले होते.

बातम्या आणखी आहेत...