आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • International Solar Connection Council; 65 Lac Crores Power Generation In 12 Years

आंतरराष्ट्रीय सौर आघाडी परिषद ; 12 वर्षांत तयार करणार 65 लाख कोटींची वीज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भारत आणि फ्रान्स यांनी मिळून दोन वर्षांपूर्वी ऑक्टोबर २०१५ मध्ये आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची (आयएसए) स्थापना केली होती. रविवारी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आयएसएच्या पहिल्या परिषदेचे उद््घाटन केले. राष्ट्रपती भवनात आयोजित या परिषदेत फ्रान्स, श्रीलंका, बांगलादेशसह २३ देशांचे राष्ट्राध्यक्ष, १० देशांचे मंत्री आणि १२१ देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले. हे जगाच्या सौर ऊर्जा क्षेत्रात भारत आणि फ्रान्स यांचे मोठे पाऊल मानले जात आहे. ही संघटना जगातील सर्वात मोठ्या संघटनांपैकी एक आहे. दोन वर्षांत या संघटनेत आतापर्यंत ६१ देश सहभागी झाले आहेत, २६ देश त्याच्या करारावर स्वाक्षरी करणार आहेत.  


फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन म्हणाले की, फ्रान्स २०२२ पर्यंत आयएसएला ७०० दशलक्ष युरोचा निधी देईल. त्याद्वारे २०३० पर्यंत १००० गीगावॅट वीजनिर्मितीचे उद्दिष्ट आहे. या विजेची एकूण किंमत १००० अब्ज डॉलर असेल. अशा प्रकारे फ्रान्स सौर आघाडीला १००० दशलक्ष युरो देईल. त्याआधी त्याने संघटनेच्या स्थापनेदरम्यान ७०० दशलक्ष युरो देण्याची घोषणा केली होती. मॅक्रॉन म्हणाले की, २०१५ मध्ये अमेरिकेने पॅरिस करारावर स्वाक्षरीस नकार दिला होता. त्यानंतर आम्ही ही आघाडी स्थापन केली. आमच्या आगामी पिढीचे आयुष्य चांगले राहावे, त्यांचे भविष्य सुरक्षित राहावे, जगाला स्वस्त आणि टिकाऊ ऊर्जा मिळावी हा हेतू.  

 

पहिली आंतरराष्ट्रीय सौर आघाडी परिषद 

ऑक्टोबर २०१५ मध्ये भारत आणि फ्रान्स यांनी पॅरिसमध्ये आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची (आयएसए) स्थापना केली होती. २०१६ मध्ये फ्रान्सचे तत्कालीन अध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांनी तिच्या मुख्यालयाची कोनशिला गुडगावमध्ये ठेवली होती. एक वर्षानंतर रविवारी फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनी आयएसएच्या पहिल्या परिषदेचे उद््घाटन केले.

 

भारत २०२२ पर्यंत १०० gw वीज बनवणार  

 

परिषदेत मोदी म्हणाले की, भारत २०२२ पर्यंत ऊर्जा नवीनीकरणाच्या स्रोतांद्वारे १७५ गीगावॅट वीज तयार करेल. १०० गीगावॅट सौर ऊर्जा तयार होईल. भारताने गेल्या ३ वर्षांत २८ कोटी एलईडी बल्ब वाटले आहेत. त्याद्वारे २ अब्ज डॉलर आणि ४ गीगावॅट विजेची बचत झाली आहे. भारत सध्या २० गीगावॅट सौर ऊर्जेची निर्मिती करत आहे. देशात एकूण ५८.३० गीगावॅट नवीनीकरण ऊर्जेचे उत्पादन होते. ते एकूण उत्पादनाच्या १८.५% आहे.  

 

 

चीनवर मात करण्याची भारत-फ्रान्सची इच्छा

 जगात चीन सर्वाधिक सौर ऊर्जा उत्पादन करणारा देश आहे. चीन १३० गीगावॅट सौर ऊर्जेची निर्मिती करतो. दुसऱ्या क्रमांकावर अमेरिका, तिसरा जपान आहे. भारत व फ्रान्स या आघाडीच्या माध्यमातून चीनला मात देऊ इच्छितात. यासोबत दोघे अमेरिकेची मनमानीही रोखू इच्छितात.  

 

जगाचा वार्षिक ७ खर्व डॉलरचा खर्च

विजेच्या गरजेपोटी दरवर्षी जग ७ खर्व डॉलर खर्च करते. हे जगाच्या जीडीपीच्या सुमारे १०% आहे. गेल्या १० वर्षांत युरेनियमचे उत्पादन ४०% वाढले आहे. जगात जवळपास ६५ अणुऊर्जा प्रकल्प तयार होत आहेत. पेट्रोलियम ऊर्जा संपुष्टात येत आहे.

 

उद्देश : स्वस्त व अखंडित वीज देणे  
पॅरिस करारानुसार आयएसएचा उद्देश २०३० पर्यंत याद्वारे सौर ऊर्जेच्या क्षेत्रात १००० अब्ज डॉलरची गुंतवणूक करणे हा आहे. सदस्य देशांना कमी गुुंतवणुकीतून सौर ऊर्जेद्वारे वीज निर्मितीचे तंत्र उपलब्ध करणे. यासोबत त्यांना भविष्यातील गरजेनुसार तंत्रज्ञान व पद्धती उपलब्ध करण्याचाही समावेश आहे.  


भारत : जगात ६ पैकी ३ सर्वात मोठे प्रकल्प  
पॅरिस हवामान कराराअंतर्गत भारताने २०३० पर्यंत ४०% वीज उत्पादन गैर जीवाश्म इंधनाद्वारे करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. जगातील सहा सर्वात मोठ्या प्रकल्पापैकी भारतात तीन आहेत. यामध्ये जगातील तिसरे सर्वात मोठे सोलर पार्कही आहे. हे आंध्र प्रदेशच्या कुर्नूलमध्ये आहे.  

 

 पुढील स्‍लाइडवर पाहा, आघाडीत ८०% देश कर्कवृत्त व मकरवृत्त यांच्यामधील...

 

 

बातम्या आणखी आहेत...