आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंतरराष्ट्रीय वैश्य महासंमेलनाचे प्रतिनिधी राहुल गांधींना भेटणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ- आंतरराष्ट्रीय वैश्य महासंमेलनाचे शिष्टमंडळ लवकरच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेणार आहे. देशाच्या विकासात वैश्य समाजाच्या सक्रिय योगदानाची दखल घेऊन काँग्रेसची कार्यकारी समिती, केंद्रीय निवडणूक समिती तथा इतर समित्यांवर योग्य ती भागीदारी देण्यात यावी, अशी मागणी महासंमेलनाचे सरचिटणीस बाबूराम गुप्ता यांनी केली आहे.  


राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाची धुरा हाती घेतली आहे. त्याबद्दल महासंमेलनाने त्यांचे अभिनंदन केले आहे. वैश्य समाजाच्या योगदानावर संघटनेचे सरचिटणीस गुप्ता पुढे म्हणाले, पक्षपाती राजकारणाला न जुमानता वैश्य समुदायाने समाजात महत्त्वाची भूमिका निभावली. परंतु गेल्या काही वर्षांत काँग्रेसच्या विविध समित्यांमध्ये समाजाला योग्य ते प्रतिनिधित्व दिले जात नाही, असे दिसते. त्याची संपूर्ण वैश्य समाजाला सल असून आम्ही उपेक्षित असल्याचे अनुभवत आहोत. यासंबंधी महासंमेलनाचे शिष्टमंडळ लवकरच राहुल गांधी यांची भेट घेईल.

बातम्या आणखी आहेत...