आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयएनएक्स मीडिया लाच प्रकरण: कार्ती आणि इंद्राणीची 4 तास समाेरासमाेर चौकशी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आयएनएक्स मीडिया लाच प्रकरणात रविवारी सीबीआयने कार्ती चिदंबरम आणि कंपनीच्या माजी संचालक इंद्राणी मुखर्जी यांना समोरासमोर बसवून जवळपास चार तास चौकशी केली. मुंबईतील भायखळा तुरुंगात ही चौकशी केली गेली.   


कार्ती यांना पाच दिवसांच्या कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांना ६ मार्चला पुन्हा एकदा न्यायालयासमोर उभे केले जाईल. माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती यांना सीबीआयच्या सहा सदस्यीय टीमने सकाळी ११.१५ वाजता दिल्लीहून मुंबईतील भायखळा तुरुंगात आणण्यात आले. आपली मुलगी शीना बोराच्या हत्या प्रकरणात इंद्राणी या तुरुंगात कैदेत आहे. प्राप्त माहितीनुसार, इंद्राणीने कार्ती यांच्यावरील आरोपांचा पुनरुल्लेख केला. चौकशीचे चित्रीकरण करण्यात आले.

 

दुपारी ३.१५ वाजता सीबीआयची टीम तुरुंगातून बाहेर पडली आणि दिल्लीकडे निघून गेली. तुरुंगातून बाहेर पडताना कार्ती यांनी त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप खोटे असल्याचे सांगितले. वर्ष २००७ मध्ये इंद्राणी आणि पीटरच्या कंपनीला ३०५ कोटींची परदेशी गुंतवणुकीला मंजुरी देण्यासाठी कार्ती यांनी १० लाख डॉलरची लाच मागितल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्या दरम्यान चिदंबरम केंद्रीय अर्थमंत्री होते.  

बातम्या आणखी आहेत...