आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमानांसाठी धोकादायक ठरणारे ड्रोन हवेतच अडवले जाणार, डिव्हाइस आरोपींपर्यंतही पोहोचणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - विमानांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरणाऱ्या ड्रोनवरील उपाय सुरक्षा यंत्रणांनी शोधून काढला आहे. इस्त्रायल तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तयार एक सिक्यूरिटी डिव्हाइसचे इंदिरा गांधी अंतरराष्ट्रीय विमानतळावर यशस्वी परीक्षण करण्यात आले आहे. नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने विमानतळाची हद्द ओलांडणाऱ्या ड्रोनला ते जिथून उडाले तिथे परत पाठवले जाऊ शकणार आहे. या डिव्हाइसच्या मदतीने तपास यंत्रणांना ड्रोन उडवणाऱ्यापर्यंतही पोहोचता येणार आहे. 

 

डिव्हाइस परीक्षण यशस्वी 
- सीआयएसएफचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, ड्रोनवर नियंत्रण मिळवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या डिव्हाइसचे रविवारी इंदिरा गांधी अंतरराष्ट्रीय विमानतळावर (आयजीआय) यशस्वी परीक्षण करण्यात आले. जूनपर्यंत हे डिव्हाइस आयजीआय सह देशातील प्रमुख विमानतळांवर तैनात केले जाणार आहे. 
- सध्याच्या घडीला निषिध्द क्षेत्रात उड्डाण करणारे ड्रोन पाडणे हा एकमेव उपाय होता. दुसरीकडे त्याला उडवणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचणे जवळजवळ अशक्य होते. 
- ड्रोनचा धोका फक्त विमानतळांनाच नाही तर राष्ट्रीय सुरक्षेलाही ते धोकादायक ठरु शकतात. ड्रोनच्या माध्यमातून अनेक संवेदनशील ठिकाणांची हेरगिरी केली जाऊ शकते. 

 

ड्रोन उडवणाऱ्याचाही माग काढणार  
- इस्त्रायलच्या नव्या तंत्रज्ञानाने तयार डिव्हाइस हे ड्रोनचे कम्यूनिकेशन सिस्टम हॅक करेल आणि त्यावर नियंत्रण मिळवेल. त्यानंतर ड्रोनने जिथून उड्डाण केले होते तिथेच त्याला परत पाठवले जाईल, तसे निर्देश ड्रोनला दिले जातील. कमांड मिळताच ड्रोन परत जाईल. 
- ड्रोनचा रुट ट्रॅक करुन सुरक्षा यंत्रणा त्याला उडवणाऱ्यापर्यंत पोहोचू शकणार आहे. त्यासोबतच हे डिव्हाइस ड्रोनचा सर्व डाटा सहजपणे मिळवू शकणार आहे. 

 

ड्रोनमुळे विमान अपघाताची शक्यता 
- ड्रोनचा सर्वाधिक धोका हा विमानांना आहे. विमानांचे इंजिन एवढे शक्तीशाली असतात की 10 ते 15 मीटर अंतरापर्यंत उडणारी कोणतीही वस्तू ते खेचून घेऊ शकतात. त्यामुळे टेक-ऑफ किंवा लँडिंग करताना एखादे ड्रोन विमानाच्या कक्षेत आले तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे शेकडो प्रवाशांना जीव गमवावा लागू शकतो.

बातम्या आणखी आहेत...