आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - फोर्ब्सच्या 30 अंडर 30 एशिया लिस्टमध्ये भारताचा दबदबा वाढला आहे. यावर्षी लिस्टमध्ये विविध क्षेत्रांतून एकूण 300 नावे निवडण्यात आली आहेत. यात 65 तरुणांसोबत भारत पहिल्या स्थानावर आहे. दुसरीकडे चीनच्या 59 तरुणांनाही या यादीत स्थान मिळालेले आहे. या यादीत पोलो टीमचे कॅप्टन आणि जयपूरचे राजा पद्मनाभ सिंहही आहेत. ते येथील राजा सवाई मानसिंह यांचे सुपुत्र आहेत आणि ते नेहमी आपल्या लक्झरी लाइफसाठी ओळखले जातात. तथापि, देशातील राजघराणे-संस्थाने पूर्णपणे खालसा करण्यात आलेली आहेत, परंतु अजूनही राजघराण्यांमध्ये राज्याभिषेकाचा विधी करून राज्याचा वारसा हक्क प्रतीकात्मकरीत्या दिला जातो.
अशी आहे पद्मानाभ सिंहची लाइफ स्टाइल
- पद्मानाभ देश-विदेशात होणाऱ्या अनेक पेज-3 पार्टीजमध्ये दिसतात. यासोबतच ते जयपूरमध्ये होणाऱ्या अनेक फॅशन आणि विविध तऱ्हेच्या इव्हेंट्समध्येही दिसतात.
- ते नेहमी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह राहतात आणि त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर अनेक व्हिंटेज कारसोबत फोटोही शेअर केलेले आहेत.
- तथापि, जयपूर रॉयल फॅमिलीकडेही अनेक लक्झरी व्हिंटेज कार आहेत. यासोबतच ते इंडियन पोलो टीमकडूनही खेळतात.
कोट्यवधींचे मालक आहेत पद्मनाभ
- जयपूर राजघराण्याकडे अब्जावधींची संपत्ती आहे, परंतु सुप्रीम कोर्टाने राजघराण्याच्या अनेक मालमत्तांवर 1992 पासून रिसीव्हर नियुक्त केलेला आहे. तेव्हापासून आतापर्यंत यावर कोणताही निर्णय झालेला नाही.
- भवानी सिंह यांचे वडील सवाई मानसिंह द्वितीय यांची काही संपत्ती होती, मानसिंहनंतर भवानी सिंह त्यांचे उत्तराधिकारी बनले. तेव्हापासून 1986 पर्यंत सगळे काही ठिकठाक सुरू होते, परंतु त्यानंतर संपूर्ण संपत्तीच्या वाटणीवरून माजी राजमाता गायत्री देवी, भवानी सिंह यांचे भाऊ जयसिंह, पृथ्वी सिंह आणि जगतसिंह एकीकडे झाले. त्यांनी दिल्ली हायकोर्टात संपत्तीच्या वाटणीचा दावा दाखल केला.
- तेव्हापासून आतापर्यंत राजघराण्याच्या अनेक मालमत्तांच्या केसेस कोर्टात सुरू आहेत.
माजी महाराजांनी घेतले होते दत्तक
- महाराजा सवाई मानसिंह आणि त्यांच्या पहिल्या पत्नी मरुधर कंवर यांचे पुत्र भवानी सिंह यांचे लग्न पद्मिनी देवींशी झाले होते. त्यांची एकुलती एक मुलगी आहे दीया कुमारी.
- दीया कुमारी यांचे लग्न नरेंद्र सिंहशी झाले. त्यांना दोन मुले पद्मनाभ सिंह आणि लक्ष्यराज सिंह आहेत. मुलगी आहे गौरवी. दीया सध्या सवाई माधोपूरमधून भाजप आमदार आहेत.
- पद्मनाभ सिंह यांनी 12 वर्षे वयात जयपूर गादी सांभाळली, तर दुसरा मुलगा लक्ष्यराज सिंहने फक्त 9 साल वर्षे वयात ही जबाबदारी सांभाळली.
- महाराजा ब्रिगेडियर भवानी सिंह यांना मुलगा नव्हता. त्यांनी 2002 मध्ये आपली मुलगी दीया कुमारी हिच्या मुलांना दत्तक घेतले होते. भवानी सिंह यांच्या निधनानंतर 2011 मध्ये त्यांचे वारस म्हणून पद्मनाभ सिंह यांचा राज्याभिषेक झाला होता आणि लहान मुलगा लक्ष्यराज 2013 मध्ये गादीवर बसला.
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, अब्जाधीश पद्मनाभ सिंह यांचे आणखी काही फोटोज...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.