आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुपवाडा चकमक : 48 तास चाललेल्या ऑपरेशनमध्ये 5 दहशतवादी ठार, लष्कर-पोलिसांचे 5 जवान शहीद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुपवाडा येथे अजूनही सर्च ऑपरेशन सुरु आहे. - Divya Marathi
कुपवाडा येथे अजूनही सर्च ऑपरेशन सुरु आहे.

श्रीनगर - जम्मू कश्मीरमधील कुपवाडा येथे सुरक्षरक्षक आणि दहशतवादी यांच्यात गेल्या 48 तासांपासून सुरु असलेल्या चकमकीत 5 दहशतवादी ठार झाले आहेत. या ऑपरेशनमध्ये भारतीय लष्कर आणि पोलिसांचे 5 जवान शहीद झाले आहेत. याशिवाय एका अधिकाऱ्यासह तीन जखमी आहेत. मारले गेलेले पाचही दहशतवादी हे पाकिस्तानचे असून ते लष्कर-ए-तोएबाशी संबंधीत होते, असे काश्मीरचे आयजी एस.पी. पाणि यांनी गुरुवारी सांगितले. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. सध्या हलमतपोरा भागात सर्च ऑपरेशन सुरु आहे. मंगळवारपासून येथे चकमक सुरु होती. 

 

दहशतवादी दडून बसल्याची मिळाली माहिती
- संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी सांगितले, की मंगळवारी लष्कराला कुपवाडामधील हलमतपोराच्या जंगलात दहशतवादी दडून बसले असल्याची सूचना मिळाली होती. 
- सुरक्षारक्षकांनी सर्च ऑपरेशन सुरु केले. लष्कर आणि दहशतवादी यांच्यात झालेल्या चकमकीत 5 दहशतवादी मारले गेले. मंगळवारी सायंकाळी उजेड कमी झाल्यानंतर ऑपरेशन थांबवावे लागले. 
- बुधवारी सकाळी लष्कराने पुन्हा सर्च ऑपरेशन सुरु केले. तेव्हा दहशतवाद्यांनी अचानक हल्ला केला. यात लष्कराचे 3 आणि पोलिसांचे दोन जवान शहीद झाले. तर दोन पोलिस कर्मचारी जखमी आहेत. 

 

हे जवान झाले शहीद 
- मोहम्मद युसुफ स्पेशल पोलिस ऑफिसर (जम्मू-काश्मीर)
- कान्स्टेबल दीपक थेसू (पोलिस)
- मोहम्मद अश्रफ (आर्मी)
- रणजीत सिंह (आर्मी) आणि आणखी एक. 

बातम्या आणखी आहेत...