आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुरहान वानीच्या मृत्यूला वर्ष झाले, जम्मू-काश्मिरात कडक सुरक्षा, एक दिवसासाठी अमरनाथ यात्रा थांबवली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फुटीरतावाद्यांनी आज जम्मू-काश्मीर बंदची घोषणा केली आहे.-फाइल - Divya Marathi
फुटीरतावाद्यांनी आज जम्मू-काश्मीर बंदची घोषणा केली आहे.-फाइल

- शनिवारी समाजकंटकांनी लष्करावर दगडफेक केली होती. 

- लष्कराने प्रत्युत्तरात केलेल्या कारवाईत तिघांचा मृत्यू झाला. 


श्रीनगर - हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वानी याच्या मूत्यूला रविवारी एक वर्ष पूर्ण झाले. त्यामुळे खबरदारी म्हणून रविवारी अमरनाथ यात्रा थांबवण्यात आली. जम्मू-काश्मीरचे डीजीपी एसपी वैद म्हणाले की, फुटीरतावाद्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये बंदची घोषणा केली आहे. अमरनाथ यात्रेकरुंच्या सुरक्षेला आम्ही प्राधान्य देतो. त्यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्था टिकवण्यासाठी आणि सुरक्षेसाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. 


शनिवारी कठुआ जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला. कुलगामच्या हवुरा मिशिपोरा परिसरात शोध मोहिमेदरम्यान जमावाने लष्करावर हल्ला केला होता. प्रत्युत्तरात सुरक्षारक्षकांकडून करण्यात आलेल्या कारवाईत 16 वर्षांच्या मुलीसह तिघांचा मृत्यू झाला. दोन जण जखमीही झाले आहेत. त्यानंतर अनंतनाग, कुलगाम, शोपियां आणि पुलवामामध्ये इंटरनेट बंद करण्यात आले आहे. 

 

दगडफेकांमागे लपले होते दहशतवादी 
संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया म्हणाले की, लष्कराचे गस्ती पथक दगडपेकीतून वाचून निघण्याचा प्रयत्न करत होते. पण अत्यंत आक्रमक अशा जवळपास 500 जणांच्या जमावाने दगडांबरोबरच पेट्रोल बॉम्बचा हल्लाही केली. दगडफेकांच्या मागे लपून दहशतवाद्यांनी जवानांवर फायरिंगही केली. 

 
गिलानी-मीरवाइज नजरकैदेत 
फुटीरतावादी नेते यासीन मलिकला शुक्रवारीच अटक करण्यात आली होती. तर सय्यद अली शाह गिलानी, मीरवाइज उमर फारूक यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. वानीला 8 जुलै 2016 रोजी अनंतनागमध्ये सुरक्षारक्षकांनी चकमकीत ठार केले होते. त्यानंतर सुमारे दोन महिने झालेल्या आंदोलनात 85 हून अधिक लोक मारले गेले होते.