आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मक्का मशीद केस : यशासाठी एनआयएचे अभिनंदन, जावेद अख्तर यांची खोचक टीका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - मक्का मशीद ब्लास्ट प्रकरणी एनआयएच्या तपासाबाबत लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी खोचक टीका केली आहे. मक्का मशीद केसमध्ये एनआयएला मिळालेल्या यशासाठी माझ्यातर्फे अभिनंदन, मिशन पूर्ण झाले.. असे ट्वीट त्यांनी बुधवारी केले. पण त्यावर भाजपा नेते जीव्हीएल नरसिम्हा राव यांनी तिखट प्रतिक्रिया दिली. त्यांनी ट्वीटमध्ये जावेद अख्तर राहुल गांधींचे फॅन असल्याचे म्हटले. न्यायालयाने मक्का मशीद ब्लास्ट प्रकरणात आरोपी ठरवण्यात आलेल्या असिमानंद यांच्यासह 5 आरोपींची पुराव्याअभावी सुटका केली होती. 


मक्का मशीद ब्लास्ट प्रकरणी ट्वीटर वॉर 
- जावेद अख्तर यांनी ट्वीट केले की, मिशन पूर्ण झाले..मक्का मशीद केसमध्ये एनआयएला मिळालेल्या यशासाठी माझ्यातर्फे अभिनंदन.. आता त्यांच्याकडे इतर धर्मातील व्यक्तीबरोबर लग्न केलेल्यांच्या तपासासाठी पुरेसा वेळ आहे. 
- जीव्हीएल नरसिम्हा राव यांनी त्यावर ट्वीट केले. जावेदजी, तुम्हाला प्रामाणिकपणे काँग्रेसच्या 'हिंदु दहशतवाद'सारख्या विचारसरणीवरही अशीच टीका करता आली असती तर बरे झाले असते. असे वाटते की, तुम्ही काल्पनिक लेख लिहिणाऱ्या राहुल गांधींचे फॅन आहात. कदाचित 'हिंदु दहशतवाद' हीदेखिल 'मौत का सौदागर'प्रमाणे तुमचीच कल्पना असेल. 


मोगलांच्या इतिहासावरूनही झाला वाद 
अख्तर आणि राव समोरासमोर येण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी ऑक्टोबर 2017 मध्येही अख्तर यांनी ट्वीटरवर लिहिले होते की, मी जीव्हीएल नरसिम्हा राव यांच्या त्या इतिहासकाराचे (आरएसएस शाखेशिवाय) नाव जाणून घेऊ इच्छीतो, जे त्यांना मोगलांबाबत माहिती देतात. 

 

 

बातम्या आणखी आहेत...