आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जया बच्चन सपाकडून पुन्हा राज्यसभेत जाणार, चौथ्यांदा बनणार वरिष्ठ सभागृहाच्या सदस्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जया बच्चन यापूर्वी 2004, 2006 आणि पुन्हा 2012 मध्ये समाजवादी पार्टीच्या वतीने वरिष्ठ सभागृहासाठी निवडून आल्या होत्या. (फाइल) - Divya Marathi
जया बच्चन यापूर्वी 2004, 2006 आणि पुन्हा 2012 मध्ये समाजवादी पार्टीच्या वतीने वरिष्ठ सभागृहासाठी निवडून आल्या होत्या. (फाइल)

नवी दिल्ली - समाजवादी पार्टी (एसपी) मधून जया बच्चन चौथ्यावेळी राज्यसभेवर जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. अखिलेश यादव यांनी त्यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवण्याची तयारी केली असल्याचे वृत्त आहे. याबाबत केवळ औपचारिक घोषणा व्हायची आहे.

 

 

जया यांचे नाव निश्चित झाल्यामुळे नरेश अग्रवाल आणि किरणमय नंदा या स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. त्यामागचे कारण म्हणजे राज्यात सपाच्या आमदारांची संख्या 47 आहे. त्यामुळे पक्षाला केवळ एकच खासदार राज्यसभेत पाठवता येणार आहे. राज्यसभेत सध्या सपाचे सहा खासदार आहेत. नरेश आणि जया यांच्यासह सर्वांचा कार्यकाळ 2 एप्रिलला संपतोय. उत्तर प्रदेशातील 10 जागांसाठी 23 मार्चला मतदान होतेय. 


युपीमध्ये कोणाकडे किती शक्ती?
एकूण 403 विधानसभा मतदारसंघ 

अपना दल - 09
भारतीय समाज पार्टी - 04
भाजपसह इतर 324
समाजवादी पार्टी (सपा) - 47
बहुजन समाज पार्टी - 19
काँग्रेस - 07
राष्ट्रीय लोक दल - 01
निषाद पार्टी - 01
अपक्ष - 03

 

बातम्या आणखी आहेत...