आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SCने महाराष्ट्राकडून जज लोया यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट मागितला, म्हणाले- प्रकरण अतिशय गंभीर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारकडून सोहराबुद्दीन शेख एन्काऊंटर केस प्रकरणाची सुनावणी करणारे सीबीआय विशेष न्यायालयाचे न्यायाधीश बी.एच. लोया यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट मागवला आहे. कोर्ट म्हणाले, की प्रकरण अतिशय गंभीर आहे. कोर्टात दोन याचिका दाखल झाल्या आहेत. त्यांनी लोया यांच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी केली आहे. यातील एक पिटीशन महाराष्ट्रातील पत्रकार बी.आर. लोन तर दुसरी काँग्रेस नेते तहसीन पूनावाला यांनी दाखल केली आहे. कोर्टाने या प्रकरणाची पुढील सुनावणी सोमवारी ठेवली आहे. 

 

कसा झाला होता मृत्यू? 
- लोया 1 डिसेंबर 2014 ला नागपूर येथे त्यांच्या सहकाऱ्याच्या मुलीच्या लग्नाला जात होते. तेव्हा त्यांना ह्रदय विकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला होता.

 

जजच्या मृत्यू संशयास्पद का?
- गेल्या वर्षी लोया यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या बहिणीने त्यांचा मृत्यू संशयास्पद असल्याचे म्हटले होते. 
- न्यायधिश लोया यांच्या मृत्यूचे तार सोहराबुददीन एन्काऊंटरसोबत जोडण्यात आले होते. त्यानंतर लोया यांचे मृत्यू प्रकरण मीडियामध्ये चर्चेत आले होते.


याचिकेवर तत्काळ सुनावणी का? 
- महाराष्ट्रातील पत्रकार बी.आर. लोन यांनी त्यांच्या याचिकेवर तत्काळ सुनावणीची मागणी केली आहे. त्यांचे म्हणणे आहे, की लोया यांचा मृत्यू रहस्यमय आहे त्याची चौकशी होण्याची गरज आहे. चौकशीनंतरच मृत्यूचे सत्य समोर येईल. 
- गुरुवारी दुपारनंतर काँग्रेस नेते तहसीन पूनावाला यांच्यावतीने वकील वरिंदर कुमार शर्मा यांनीही एक पिटीशन फाइल करत लोया यांच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी केली. 
- पूनावाला यांचे म्हणणे आहे, की जज लोया यांचा मृत्यू संशयास्पद आहे. त्यांच्या मृत्यूबद्दल अनेकांचे परस्पर विरोधी मतं नोंदवली गेली आहेत. 
- या याचिकेवर सरन्यायाधिश दीपक मिश्रा, जस्टिस ए.एम. खानविलकर आणि जस्टिस डी.वाय. चंद्रचूक यांच्या पीठाने तत्काळ सुनावणी करण्यास मंजूरी दिली आहे.  


काय आहे सोहराबुददीन एन्काऊंटर केस? 
- सीबीआयनुसार गुजरातच्या दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) सोहराबुद्दीन शेख आणि त्याची पत्नी कौसर बी यांना ते हैदराबाद येथून महाराष्ट्रातील सांगलीला जात असताना त्यांना पकडले होते. 
- 2005 च्या नोव्हेंबरला गुजरातमधील गांधीनगर जवळ त्यांचा कथित बनावट एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला होता. असाही दावा केला जात होता की शेखचा पाकिस्तानातील दहशतावादी संघटना लष्कर-ए-तोएबासोबत संबंध होता. 
- डिसेंबर 2006 मध्ये चकमकीचा प्रत्यक्ष साक्षीदार आणि शेखचा सहकारी तुलसीराम प्रजापतीचीही कथितरित्या गुजरात पोलिसांनी हत्या केली होती. अमित शाह तेव्हा गुजरातचे गृह राज्यमंत्री होते. त्यांच्यावर दोन्ही घटनांमध्ये सहभागी असल्याचा आरोप होता.

 

अमित शाह यांच्यासह अनेक आरोपी निर्दोष? 
- सोहराबुद्दीन एन्काऊंटर केस 2012 मध्ये सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रामध्ये चालवण्यास सांगितले होते. यानंतर सोहराबुददीन एन्काऊंटर केसची ट्रायल महाराष्ट्रात सुरु झाली होती. 2013 मध्ये सुप्रीम कोर्टाने प्रजापती आणि सोहराबुददीन केस एक केली होती. 
- पहिल्या केसची सुनावणी जज जे.टी उत्पात करत होते. मात्र 2014 मध्ये त्यांची अचानक बदली करण्यात आली होती आणि या केसची सुनावणी जज बी.एच. लोया यांच्याकडे देण्यात आली होती. 
- सोहराबुददीन एन्काऊंटर केसमध्ये भाजप अध्यक्ष अमित शाह, राजस्थानचे गृहमंत्री गुलाबचंद कटारिया, राजस्थानचे बिझनेसमॅन विमल पाटनी, गुजरात पोलिसचे माजी प्रमुख पी.सी.पांडे, एडीजीपी गीता जौहरी, गुजरात पोलिसचे अधिकारी अभय चुडासम्मा आणि एन.के. अमीन यांना निर्दोष सोडण्यात आले आहे. पोलिस अधिकाऱ्यांसह एकूण 23 आरोपींविरोधात अजूनही चौकशी सुरु आहे. 

बातम्या आणखी आहेत...