आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळ्यावरून हाहाकार माजलेला असतानाच आणखी एक मोठा बँक घोटाळा समोर आला आहे. तमिळनाडूतील प्रसिद्ध दागिने कंपनी असलेल्या कनिष्क गोल्डने 14 बँकांना तब्बल 824 कोटींना गंडा घातल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या 14 बँकांमध्ये पीएनबीसह, एसबीआय आणि बँक ऑफ इंडिया सारख्या बँकांचाही समावेश आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राने प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार स्टेट बँक ऑफ इंडियाने जानेवारी महिन्यामध्ये सीबीआयकडे कनिष्क गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड ने 842 कोटांचा घोळ केल्याचे सांगत, सीबीआयला चौकशी करून मदत करण्याची मागणी केली होती. चेन्नईच्या टी नगरमध्ये कनिष्क ज्वेलरीचे ऑफिस आहे. भूपेश कुमार जैन आणि त्यांची पत्नी नीता जैन हे कंपनीचे प्रमोटर्स आणि डायरेक्टर्स आहेत. त्यांच्याशी संपर्क होत नसल्याचे बँकेचे म्हणणे आहे. सध्या ते मॉरीशियस मध्ये राहत असल्याची माहिती आहे.
बँकेने भूपेशवर बनावट दस्तऐवजांच्या आधारे कर्ज घेतल्या प्रकरणी आणि एका रात्रीत सर्व शोरूम आणि फॅक्टरी बंद करून फरार झाल्याचा आरोप केला आहे. मात्र अद्याप या प्रकरणी एफआयआर दाखल झाला नसल्याची माहीती समोर आली आहे. जैनला 824 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते, पण व्याज आणि मुद्दलासह आता कर्जाची रक्कम 1000 कोटींच्या वर गेली असल्याचे बँकांचे म्हणणे आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.