आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंकितच्या शोकसभेतून उठून गेले केजरी, कुटुंबिय करत राहिले नुकसानभरपाईची मागणी - MLA मिश्रा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंकितच्या शोकसभेत मुख्यमंत्री केजरीवाल. - Divya Marathi
अंकितच्या शोकसभेत मुख्यमंत्री केजरीवाल.

नवी दिल्ली - दिल्लीमध्ये हत्या झालेल्या अंकित सक्सेनाच्या शोकसभेत पोहोचलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अंकितच्या कुटुंबियांचा अपमान केल्याचे आमदार कपिल मिश्रा म्हणाले आहेत. मिश्रा यांनी एक व्हिडिओ ट्विटवर शेअर केला आहे. यामध्ये मुख्यमंत्र्यांकडे नुकसानभरपाईची मागणी करताच ते उठून निघाल्याचे दिसत आहे. 1 फेब्रुवारी रोजी अंकितच्या प्रेयसिच्या कुटुंबियांनी त्याची हत्या केली होती. यानंतर भाजपने अंकितच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी केली होती. 

 

काय आहे व्हिडिओमध्ये ? 
- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मंगळवारी अंकित सक्सेनाच्या शोकसभेत गेले होते. तिथे त्याच्या कुटुंबियांची त्यांनी भेट घेतली. 
- अंकितच्या कुटुंबियांनी नुकसानभरपाईचा विषय छेडताच केजरीवाल उठून उभे राहिले आणि येथे या विषयावर चर्चा नको. मदतनिधीचा वाद येथे नको असे सांगत ते तडकाफडकी निघाले. 
- यावेळी एक व्यक्ती केजरीवाल जी सुनिए... केजरीवाल जी सुनिए.... असे ओरडत होता मात्र मुख्यमंत्री निघून गेल्याचे आमदार कपिल मिश्रांनी म्हटले आहे. 
- मिश्रांचा दावा आहे की केजरीवालांमागे ओरडत धावणारी व्यक्ती अंकितचे वडील होते.

बातम्या आणखी आहेत...