आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्नाटकात उद्या भाजपची अग्निपरीक्षा: विधानसभेत बहुमत चाचणीच्या तीन शक्यता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सुप्रीम कोर्टाने कर्नाटक विधानसभेत शनिवार सायंकाळी 4 वाजता  बहुमत चाचणी घेण्याचे निर्देश दिले आहेत. एकप्रकारे सुप्रीम कोर्टाने राज्यपाल वजूभाई वाला यांचा निर्णय फिरवला आहे. राज्यपाल वाला यांनी बी.एस. येदियुरप्पा यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली होती. आता उद्या सायंकाळी फैसला होणार आहे, की बहुमताशिवाय दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेले येदियुरप्पा मुख्यमंत्रीपदाची खुर्ची वाचवू शकतात की काँग्रेस-जेडीएसची सरशी होते. कर्नाटकात भाजपकडे 104, काँग्रेसकडे 78 आणि जेडीएस+बसपाकडे 38 आमदार आहेत. बहुमतासाठी 112 आमदारांची आवश्यकता आहे. अशावेळी सभागृहात काय होऊ शकते, याच्या तीन शक्यता आहे.


#1- सध्याच्या स्थितीनुसार बहुमत चाचणीत भाजप पराभूत होणार 
- 2 जागांवर मतदान झाले नाही त्यामुळे एकूण जागा : 222
- कुमारस्वामी दोन जागांवरुन विजयी त्यामुळे एकूण जागा : 221 
- 1 प्रोटेम स्पीकर झाल्यानंतर : 220 
- बहुमतासाठीचा आकडा : 111 
- भाजप : 104 (बहुमतापेक्षा 7 कमी)
- काँग्रेस-जेडीएस : 116 (बहुमतापेक्षा 5 जास्त)

 

#2 - काँग्रेस-जेडीएसचे 13 सदस्य गैरहजर राहिले तर भाजपला संधी 
- 2 जागांवर मतदान झाले नाही त्यामुळे एकूण जागा : 222
- कुमारस्वामी दोन जागांवरुन विजयी त्यामुळे एकूण जागा : 221 
- 1 प्रोटेम स्पीकर झाल्यानंतर : 220 
- काँग्रेस-जेडीएस आघाडीचे 13 आमदार सभागृहात गैरहजर राहिले तर : 207 
- बहुमताचा आकडा : 104 
- भाजप : 104 (बहुमत सिद्ध)
- काँग्रेस+जेडीएस : 103 (13 सदस्य गैरहजर राहिले तर)

 

#3 - एक अपक्ष आणि दोन इतर पक्षांच्या आमदारांनी भाजपला साथ दिली तर.. 
- 2 जागांवर मतदान झाले नाही त्यामुळे एकूण जागा : 222
- कुमारस्वामी दोन जागांवरुन विजयी त्यामुळे एकूण जागा : 221 
- 1 प्रोटेम स्पीकर झाल्यानंतर : 220 
- काँग्रेस+जेडीएस आघाडीचे 7 आमदार बहुमत चाचणीवेळी गैरहजर राहिले तर सभागृहात : 213 
(या स्थितीत भाजप विजयी होण्याची शक्यता सर्वाधिक आहे. कारण काँग्रेसचे 4 आमदार दोन दिवसांपासून बेपत्ता आहे. 3 आमदार भाजपच्या गोटात गेले तर हा आकडा 7 होतो)
- बहुमताचा आकडा : 107 
- भाजप 104 + इतर 3 = 107
(इतर 3 मध्ये एक अपक्ष, एक केपीजेपी आमदार आणि एक बसपा आमदार यांचा समावेश आहे.) 

बातम्या आणखी आहेत...